Join us

वाऱ्यावर उडणारा पदर अन् मोकळे केस; ऋतुजा बागवेच्या साडीतील लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 13:01 IST

Rutuja bagwe: ऋतुजा या लूकमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे(Rutuja Bagwe). नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तीनही माध्यमांमध्ये तिचा वावर आहे. त्यामुळे तिची लोकप्रियताही तितकीच असल्याचं दिसून येतं. ऋतुजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती तिचे काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या ऋतुजाने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने काळ्या रंगाची छान साडी नेसली असून त्यावर प्राजक्ताच्या फुलांची डिझाइन आहे. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तसंच या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'ऐसा क्यूँ' हे गाणं सुरु आहे. ऋतुजाने बहुरुपा या ब्रँडची साडी परिधान केली आहे.

दरम्यान, ऋतुजाचा हा व्हिडीओ सध्या लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही तिच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. ऋतुजा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'नांदा सौख्य भरे', चंद्र आहे साक्षीला अशा कितीतरी मालिकांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :ऋतुजा बागवेटेलिव्हिजनसेलिब्रिटी