Join us

अखेर रुपालीने तिच्या तालावर भावाला नाचवलच; 'गुलाबी शरारा'वर बहिणी-भावाचा अफलातून डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 17:42 IST

Rupali bhosale: रुपालीच्या भावाने पहिल्यांदाच सोशल मीडियावर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर दररोज असंख्य गोष्टी ट्रेंड होत असतात. यात बऱ्याचदा काही गाणी ट्रेंड होताना दिसतात. विशेष म्हणजे कलाकार मंडळी सुद्धा हे ट्रेंड उत्तमरित्या फॉलो करतात. गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांमध्ये गुलाबी शरारा हे गाणं तुफान लोकप्रिय होत आहे. अनेकांनी याच्यावर रिल्स सुद्धा शेअर केले आहेत. त्यामुळे हे गाणं गाजत असताना त्याच्यावर व्हिडीओ शूट करायचा मोह संजनाला म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले (rupali bhosale) हिला सुद्धा आवरला नाही.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली रुपाली सोशल मीडियावरील प्रत्येक ट्रेंड फॉलो करत असते. यावेळी सुद्धा तिने गुलाबी शरारा या गाण्यावर रिल शेअर केलं. विशेष म्हणजे यावेळी तिने तिच्या भावाला सुद्धा तिच्या तालावर नाचवलं.

रुपालीने तिच्या भावासोबत भन्नाट डान्स केला आहे. मात्र, या रिलसाठी तिला तिच्या भावाला चक्क बर्गरचं आमिष दाखवावं लागलं. त्यानंतर त्याने तिच्यासोबत डान्स केला. दरम्यान, गुलाबी शरारा या गाण्यावर रुपालीने भन्नाट डान्स केला असून तिने खास या रिलसाठी गुलाबी रंगाची साडीही नेसली होती. त्यामुळे तिच्या या व्हिडीओवर नेटकरी तुफान कमेंट करत आहेत.  

टॅग्स :रुपाली भोसलेटेलिव्हिजनसेलिब्रिटीआई कुठे काय करते मालिका