Join us
Daily Top 2Weekly Top 5

“महाराष्ट्र खरंच भारी आहे का?”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 17:59 IST

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

छोट्या पडद्यावरील मालिकांत काम करुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋचा आपटे. कॉलेज जीवनापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केलेल्या ऋचाने रंगभूमीही गाजवली आहे. अनेक नाटकांमध्ये काम करुन तिने स्वत:ची ओळख निर्माण केली. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. ऋचाने ‘बन मस्का’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘असं माहेर नको गं बाई’ या मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली.

ऋचा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्टबद्दल ती पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती देत असते. सध्या ऋचाने केलेल्या अशाच एका इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा रंगली आहे. ऋचाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये “महाराष्ट्र असा आहे, महाराष्ट्र तसा आहे, हे इतकी वर्षं आपण ऐकत आलोय. पण सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे?” असं म्हटलं आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ऋचाला पोस्टमधून नेमकं काय म्हणायचं आहे? तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल ही पोस्ट आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

“चांद्रयान ३ ने टिपलेले चंद्राचे काही फोटो”, मुंबई-गोवा महामार्गाचे फोटो शेअर करत हेमंत ढोमेचं ट्वीट

सनी देओलचा ‘गदर २’ पाहून चाहते नाराज, म्हणाले, “दिग्दर्शकाच्या मुलाला लॉन्च करण्यासाठी...”

दरम्यान, ऋचाने एप्रिल २०२१मध्ये अभिनेता क्षितीश दातेबरोबर लग्नगाठ बांधली. क्षितीशही एक उत्तम अभिनेता आहे. ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. झी वाहिनीवरील लोकमान्य या मालिकेतही तो मुख्य भूमिकेत होता. ऋचा आणि क्षितीशने ‘बन मस्का’ मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या सेटवरच त्यांच्यातील प्रेमसंबंध फुलले. त्यानंतर त्यांनी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली.

टॅग्स :मराठी अभिनेतामहाराष्ट्र