Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री राधा सागर अक्कलकोट स्वामी समर्थांच्या भक्तीत तल्लीन; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 11:26 IST

राधा सागर ही मराठी कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे.

Radha Sagar: राधा सागर (Radha Sagar) ही मराठी कलाविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. सध्या राधा सागर 'सुशीला-सुजीत' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री बऱ्याच कालावधीनंतर ती अभिनय क्षेत्रात पुनरागमन करते आहे. लवकरच सुशीला-सुजीत या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, हा मराठी चित्रपट येत्या १८ एप्रिल २०२५ ला प्रदर्शित होत आहे. 'सुशीला- सुजीत' या चित्रपटाची निर्मिती ही स्वप्नील जोशी याच्यासह मंजिरी व प्रसाद ओकने केली आहे. त्यामुळे या चित्रपटात नवीन काय पाहायला मिळणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच 'सुशीला-सुजीत' च्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्रीने थेट अक्कलकोट गाठलं आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

दरम्यान, सुशीला-सुजीत चित्रपटातून राधा सागर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सज्ज झाली आहे. याआधी तिने अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. स्वामी समर्थांच्या चरणी अभिनेत्री नतमस्तक झाली. याचा खास व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केल्याचा पाहायला मिळतोय. श्री स्वामी समर्थ के चरणों में वंदन करें... असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे. त्यामुळे अभिनेत्रीवर चाहते कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. 

अभिनेत्री राधा सागरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, आई कुठे काय करते या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेमुळे अभिनेत्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने अंकिता नावाचं पात्र साकारलं होतं. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीअक्कलकोट