Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री राधा सागरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 13:58 IST

राधाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे.

मराठी अभिनेत्री राधा सागर (Radha Sagar) गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत होती. नुकतंच अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला आहे. राधा सागरने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी तिने चाहत्यांसोबत सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. राधावर सध्या कुटुंबीय आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

राधाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. राधाने नवऱ्याच्या हातावर हात ठेवलेला दिसतोय  तर तिच्या हातावर एक चिमुकला हात आहे. याला कॅप्शन देत तिने लिहिले,'आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण. आमच्या बाळाचा जन्म. त्याच्या येण्याने सगळंच तेजोमय झालंय. मॅजिकल बॉय आहे. बाळा, आमची आईबाबा म्हणून निवड केल्याबद्दल खूप आभार. आम्ही खरोखरंच धन्य झालो.' 

राधाच्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक केले असून कमेंट्समध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. लेकाच्या जन्माच्या आधीच राधाने नवीन घर घेत खुशखबर दिली होती. तिने नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पुण्यात तिने नवीन फ्लॅट घेतला असून सध्या ती तिथेच राहत आहे. नवीन घरातच नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. राधाने 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर ती 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतही दिसली. प्रेग्नंसीमुळे तिने कामातून ब्रेक घेतला. आता लेकाच्या जन्मानंतर राधा परत कधी कमबॅक करते यासाठी चाहत्यांना वाट बघावी लागणार आहे.

टॅग्स :मराठी अभिनेताआई कुठे काय करते मालिकाप्रेग्नंसीसोशल मीडिया