Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'राजसा, जवळी जरा बसा'; प्रार्थना बेहरेच्या नजाकतीने नेटकरी घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 19:05 IST

Prarthana behere: तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी विशेष पसंती दिली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या नजरा कायम वेधून घेणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे (prarthana behere).  सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. नेहा ही भूमिका साकारुन विशेष लोकप्रिय झालेल्या प्रार्थनाचा आज मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. प्रार्थना कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने फोटोसह तिचा एक सुंदर व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

अलिकडेच प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर एक मनमोहक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी नेसली असून त्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रार्थनाने अत्यंत साधा मेकअप केला आहे. तसंच केस मोकळे सोडले आहेत. सोबतच त्याला साजेसं कॅप्शनही दिलं आहे.

"राजसा, जवळी जरा बसा,जीव हा पिसा तुम्हांविण बाई..कोणता करू शिणगार सांगा तरी काही", असं कॅप्शन देत प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी विशेष पसंती दिली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन