सालस, सोज्वळ सून म्हणून झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajaktta Mali ) हिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. होय, प्राजक्ताने योगासन करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता काकासन करताना दिसतेय. पण खास बात काय तर या व्हिडीओवरच्या कमेंट्स. चाहत्यांनी या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे.
‘तोंडावर पडशील...हास्यजत्रा अपुरी राहून जाईल,’अशी कमेंट एका युजरने केली आहे. योगा करायचा तर खा खा का करायची...? बिस्किटं खा... फरसाण खां... अशी मजेशीर प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. पडशील गं, नीट जरा सांभाळून, अशी कमेंट एका युजरने केली आहे. योगा झाल्यावर बॅक टू फरसाण..., अशी मजेशीर कमेंट एकाने केली आहे.