Join us

शेतात काम करणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री कोण? व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 16:58 IST

प्राजक्ता  ही सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्राजक्ता गायकवाडला ओळखले जाते. तिने आतापर्यंत विविध मालिकांमध्ये काम केले आहे. 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती. प्राजक्ता  ही सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. तिच्या एका व्हिडीओनं चाहत्याचं लक्ष वेधलं आहे.

 प्राजक्ता गायकवाडनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शेतात कोथिंबीर निवडताना दिसून येत आहे. या व्हिडीओला प्राजक्तानं कॅप्शन दिलं, 'त्याचं झालं असं... आजी म्हणाली कोथिंबीरीच्या वड्या करूयात.... मग म्हटलं आणूयात कोथिंबीर शेतात जाऊन'. प्राजक्ताच्या या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होतोय. अनेक चाहते तिचं कौतुक करत आहेत.

प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.  एका युजरने कमेंटमध्ये लिहलं, 'काय ती कोथिंबीर काय ते रुपडं... सगळ एकदम ओक्केमध्ये हाय'. तर एकाने म्हटलं, 'अरे वावावा...काय भारी दिसते ग... भन्नाट रील आहे... आणि कोथिंबीर हातात घेऊनपण सुंदर दिसते एकदम.. आवडलं मनापासून खूप सुंदर दिसते आहे'. तर आणखी एकाने लिहलं, 'येसू बाईंची भूमिका छान केली तुम्ही'. शिवाय एकाने 'झाल्या का कोथींबीर वड्या बनवून', असंही विचारलं. 

प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी ते सांगत असते. चाहतेही तिच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुकत असतात. आपल्या कामाबरोबरच प्राजक्ताने तिच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील चांगलीच प्रगती करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने स्वतःचं घर घेतलं. तर लवकरच ती 'सिंगल' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सिंपल आणि गोड अशी अमृता नामक व्यक्तिरेखा ती चित्रपटात साकारणार आहे.  

टॅग्स :प्राजक्ता गायकवाडसेलिब्रिटीटिव्ही कलाकारमराठी अभिनेता