Join us

कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:52 IST

ओळखलंत का या अभिनेत्रीला? कास्टिंग काऊच बद्दल म्हणाली...

मनोरंजनविश्वात कलाकारांना अनेकदा कास्टिंग काऊचला सामोरं जावं लागतं. फक्त अभिनेत्रीच नाही तर अभिनेतेही याला बळी पडतात. बॉलिवूडमध्ये तर हे अगदी उघडपणे होतं. काम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या अभिनेत्रींकडे थेट विचित्र मागणी केली जाते. कास्टिंग काऊचला नेमकी कशी सुरुवात होते? यावर नुकतंच एका मराठी अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.

'पसंत आहे मुलगी', 'सुंदरा मनामध्ये भरली', 'अंतरपाट' या काही मराठी मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री प्रगल्भा कोळेकरने (Pragalbha Kolekar) नुकतंच इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचवर भाष्य केलं. याची सुरुवात नक्की कशी होते यावर ती म्हणाली, "काही जणं 'तू मिल मै तुझे स्टार बना दुँगा' या झोनमध्ये असतात. भेटल्या भेटल्या विचारतात की आधी कोणकोणते प्रोजेक्ट केले आहेत. तुला कोणत्या पद्धतीच्या भूमिका करायच्या आहेत अशी चौकशी करतात. मग त्यानंतर तुला काय आवडतं? तुला कुठे फिरायला आवडतं? असं विचारतात. काही काही जण तर थेट 'चल बसायचं का?', 'तुला वाईन आवडते का?' असं विचारतात."

"माझं असं होतं की अरे भावा, आपण आताच भेटलोय ना..पहिलीच भेट आहे आपली. बसायचं का वगैरे हे प्रश्न तुला आत्ता का विचारायचे आहेत?  जरा तरी आपल्या फर्स्ट इम्प्रेशनचा विचार कर ना. कधी कधी प्रोजेक्ट सुरुच होत नाहीत, ऑडिशनही होत नाही. नुसत्याच त्याच्या मीटिंग्स होत राहतात. नुसतंच कॉफी प्यायला भेटा, चर्चा करा एवढंच होतं. काही जण तर मालिकेचे दिवस आम्ही कमी करु असंही म्हणतात. हा कोणता रुबाब आहे? भावा, माझं काम मी माझ्या जोरावर मिळवलं आहे. तु तुझं काम कर. अशा धमक्यांना मी घाबरत नाही."

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारकास्टिंग काऊच