Join us

"आपण कुठेतरी जायचं का?" ज्वेलरी दुकानात कार्यक्रमाला गेलेल्या अभिनेत्रीला मालकाची भलतीच ऑफर, सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:48 IST

एका ज्वेलरी दुकानाच्या उद्घाटनासाठी गेलेल्या अभिनेत्रीला दुकानाच्या मालकाने वेगळ्याच गोष्टीसाठी विचारणा करत ऑफर दिली. अभिनेत्रीने मुलाखतीत तिला आलेला हा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

अनेक सेलिब्रिटी आणि कलाकार हे वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. काही वेळेस खास कार्यक्रमांसाठी त्यांना विशेष पाहुणे म्हणून बोलवलं जातं. तर काही वेळेस सेलिब्रिटींच्या हस्ते उद्घाटनही केलं जातं. चर्चेत असलेल्या आणि लोकप्रिय सेलिब्रिटींना चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी कार्यक्रमांना बोलवलं जातं. अशाच एका कार्यक्रमाला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला मात्र वेगळाच अनुभव आला. 

एका ज्वेलरी दुकानाच्या उद्घाटनासाठी गेलेल्या अभिनेत्रीला दुकानाच्या मालकाने वेगळ्याच गोष्टीसाठी विचारणा करत ऑफर दिली. अभिनेत्रीने मुलाखतीत तिला आलेला हा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.  मराठी अभिनेत्री प्रगल्भा कोळेकर हिने नुकतीच गोष्ट फायद्याची या पॉडकास्टला हजेरी लावली होती. यामध्ये तिने तिला इंडस्ट्रीत आणि इंडस्ट्रीबाहेर आलेले अनुभव शेअर केले. ती म्हणाली, "सोनाराच्या दुकानाचं उद्घाटन होती आणि आरती करायची होती. तेव्हा ते बोलताना त्यांनी विचारलं की तुमचा काय प्लॅन आहे? मी त्यांना म्हटलं की काही नाही आता कार्यक्रम झाला. आता मी घरी जाईन इतक्या लांब आलीये तर". 

"त्यावर त्यांचं म्हणणं होतं की आपण काही प्लॅन करायचा का? मी म्हटलं कसला प्लॅन? तर ते म्हणाले की आपण कुठेतरी जायचं का? मी त्यांना म्हटलं तुम्ही मला असं का विचारताय? त्यावर ते म्हणाले की आम्ही आधी ज्या अभिनेत्रीला बोलवलेलं त्या सगळ्याला ओके होत्या. हा परिणाम होतो. तुम्ही तुम्हाला काय करायचं ते करा पण त्यावरुन आम्हाला जज करू नका", असंही प्रगल्भा म्हणाली. 

प्रगल्भाने इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचचे अनुभवही सांगितले. "काही जण तू मुझे मिल मे तुझे स्टार बनाता हू या झोनमध्ये असतात. भेटल्यानंतर तुला काय आवडतं, कुठे फिरायला आवडतं, चल बसुया का असं डायरेक्ट विचारतात. आपण आता भेटलो ना? आपली पहिली भेट आहे मग हे प्रश्न का विचारायचेत? कधी कधी ऑडिशनही होत नाही. नुसत्याच मिटिंग होतात. काही जण सिरियलचे दिवस कमी करू असं म्हणतात. माझं काम माझ्या जोरावर मी मिळवलंय. तू तुझं काम कर. मी घाबरत नाही", असंही तिने सांगितलं. 

टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटी