Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? अभिनेत्रीला डिलिव्हरी आधीच कळलं मुलगा होणार की मुलगी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 12:25 IST

नेहा गरोदर असून ती लवकरच आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. आता नेहाने डिलिव्हरी आधीच मुलगा होणार की मुलगी याबाबतही सांगितलं आहे. 

'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. सध्या नेहा कलाविश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. काही दिवसांपू्र्वीच नेहाने तिच्या चाहत्यांबरोबर एक गुडन्यूज शेअर केली. नेहा गरोदर असून ती लवकरच आई होणार असल्याची गोड बातमी तिने चाहत्यांना दिली होती. आता नेहाने डिलिव्हरी आधीच मुलगा होणार की मुलगी याबाबतही सांगितलं आहे. 

नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून तिने होणाऱ्या बाळाचं जेंडर रिव्हिल केलं आहे. या व्हिडिओमध्ये नेहा तिच्या पतीबरोबर दिसत आहे. त्यांच्यापुढे एक भांडं ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. त्यात काहीतरी टाकल्यानंतर निळा रंग सगळीकडे पसरत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. निळा रंग म्हणजे नेहाला मुलगा होणार आहे. नेहाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

नेहा सध्या परदेशात आहे. २०१९ मध्ये नेहाने ईशान बापटसोबत लग्न केलं. त्यानंतर नवऱ्यासोबत ती ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली. परदेशात डिलिव्हरी आधीच मुलगा होणार की मुलगी हे अशा पद्धतीने सांगितलं जातं. मुलगा होणार असल्याने नेहा आणि तिचा पतीही खूश आहेत. 

'मन उधाण वाऱ्याचे'नंतर नेहा 'अजूनही चांदरात आहे' मालिकेत दिसली होती. 'मोकळा श्वास', 'गडबड झाली' या सिनेमांतही तिने काम केलं होतं. लग्नानंतर परदेशात गेल्याने नेहा अभिनय क्षेत्रापासून दुरावली. मात्र तिने परदेशात राहून एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. दोन वर्षे तिने अभ्यास आणि मेहनत करून डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर ही पदवी मिळवली. आता लग्नानंतर ५ वर्षांनी नेहा आई होणार आहे. 

टॅग्स :नेहा गद्रेटिव्ही कलाकारप्रेग्नंसी