Join us

"दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला, कारण...",  हृता दुर्गुळेच्या सासूबाईंचा खुलासा, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:15 IST

"त्यावेळी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला...", हृता दुर्गुळेच्या सासूबाई असं का म्हणाल्या? 

Mugdha Shah: सर्वसामान्य माणूस असो किंवा कलाकार असो संघर्ष हा कोणालाच चुकलेला नाही. यावर बऱ्याचदा अनेक कलाकार मोकळेपणाने बोलत असतात. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्रीने मुलााखतीमध्ये सांगितलेल्या कठीण काळावर भाष्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे मुग्धा शाह. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मुग्धा शाह यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्ष काळावर भाष्य केलं आहे. 

नुकतीच मुग्धा शाह यांनी 'मराठी मनोरंजन विश्व' या चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी आयुष्याचा संघर्ष प्रेक्षकांसमोर मांडला आहे. त्यादरम्यान, मातृदिनाचं त्यांच्या आयुष्यात काय महत्व आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "आई हा शब्द माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे कारण मी माझ्या आईला पाहिलंच नाही. माझा जन्म झाला आणि २ महिन्यांनी माझ्या आईचं निधन झालं. त्याच्यामुळे मी माझ्या आईला पाहिलंच नाही. त्यामुळे आई हा शब्द त्या शब्दामागील भावना, महत्व आणि जबाबदारी हे सगळं मी पाहिलं. मला असं वाटतं की एक वेळ वडील नसले तरी मुलं मोठी होतात. त्यांना तेवढा त्रास होत नाही. पण, एकवेळ आई नसली तर एखाद्या बाळाचे किती हाल होतात याचा आपण विचार करु शकत नाही. मी तीन महिन्यांची झाल्यानंतर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं त्यानंतर सुख काय असतं ते मला माहितचं नव्हतं.पण, दु: ख मी डोंगराएवढं बघितलंय. अन्न काय असतं, भूक काय असते? हे बघितलचं नाही. त्रास, मार बघितला. उद्धवस्त बाळपण पाहिलंय."

यापुढे अभिनेत्रीने सांगितलं , "माझं लग्न विसाव्या वर्षी झालं. तोपर्यंत मी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. काहीवेळा आत्महत्या करण्यासाठी गेले आणि तिथून परत असंही घडलं आहे. या सगळ्यातून मी बाहेर आले. त्याच्यामुळे मला असं वाटतं ही एक दैवी शक्ती आहे.आता मी अध्यात्म या विषयाचा खूप अभ्यास करते. आता मला प्रारब्ध, कर्म याविषयी कळतं आहे.  आता मला त्या गोष्टी त्रास देत नाहीत. पण, आठवणी तशाच राहतात. कारण आईचं प्रेम मला माहितचं नव्हतं. तेव्हा मी विचार केला की जे माझ्यासोबत घडलं ते माझ्यामुलांसोबत होऊ नये. त्यावेळी वडील असून सुद्धा नसल्यासारखे होते. त्याच्यामुळे एकटेपणा, भूक काय असते? लाचारी काय असते या सगळ्यात मी आयुष्याची वीस वर्षे काढली. "असा खुलासा करत त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या.

अभिनेत्री मुग्धा शाह या मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अनेक मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. 'बे दुणे साडे चार', 'मिस मॅच', 'माहेर माझं हे पंढरपूर', 'संभव असंभव' सारख्या चित्रपटात त्या झळकल्या आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनऋता दूर्गुळेसेलिब्रिटी