Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या अभिनेत्रीने तिसऱ्यांदा केलं केशदान; व्हिडिओ शेअर करत म्हणाली, "सगळा दिखावा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 15:12 IST

केशदान करण्यामागे कोणतंही कारण नसून.. काय म्हणाली अभिनेत्री?

सध्या सगळीकडे महाकुंभमेळ्याची चर्चा आहे. अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांसह सामान्यांनीही महाकुंभमेळ्यामध्ये शाही स्नान केलं. मात्र दुसरीकडे एक मराठमोळी अभिनेत्री काशीला पोहोचली असून तिथे तिने केशदानही केलं आहे. याचा व्हिडिओही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसंच केशदान करण्यामागे कोणतंही कारण नसून मनातून वाटलं म्हणून केलं असं तिने म्हटलं आहे. कोण आहे ती अभिनेत्री?

अभिनेत्रीने नुकतंच इन्स्टाग्रामवर तिचा व्हिडिओ शेअर केला आहे. गुलाबी रंगाचा कुर्ता तिने परिधान केला आहे.  वाराणसीमध्ये घाटावर ती केशदानसाठी बसली आहे. तिने तिचे संपूर्ण केस दान केले असून हे या आधी दोन वेळा तिने हे केलं आहे. ही अभिनेत्री आहे मीनल वैष्णव (Meenal Vaishnav). मीनलने झी मराठीवरील लोकप्रिय 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत काम केलं होतं. तिने आपला संपूर्ण व्हिडिओ शेअर करत लिहिले, "केशदान करण्यामागे कोणतंही कारण नव्हतं. मला मनातून असं वाटलं आणि मी केलं."

मीनलच्या या व्हिडिओवर एकाने कमेंट करत विचारलं, 'हे केल्याने काय मिळतं तुम्हाला? शांती, श्रद्धा की अंधश्रद्धा?' यावर तिने उत्तर देत लिहिले, 'काही मिळत नाही. फक्त याची जाणीव होते की सगळं नश्वर आहे दिखावा आहे. हे आयुष्य...हे रुप...सगळंच."

मीनल वैष्णवने 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत भूमिका साकारली होती. यामध्ये खुशबू तावडे मुख्य भूमिकेत होती. याआधी तिने दूरदर्शनवर 'मै कुछ भी कर सकती हूँ' मालिका केली होती जी लोकप्रिय झाली होती.  

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारवाराणसी