Join us

मराठी अभिनेत्रीचं १५ वर्षांचं स्वप्न पूर्ण! मुंबईत खरेदी केलं स्वत:चं हक्काचं घर, म्हणाली- "बँकेतून लोन मिळत नव्हतं पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:20 IST

मुंबईत स्वत:च्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, मुंबईतील गगनाला भिडलेल्या घराच्या किमती पाहता, हे स्वप्न पूर्ण करणं अनेकांना जमत नाही. एका मराठी अभिनेत्रीचं मात्र मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

मुंबईत स्वत:च्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, मुंबईतील गगनाला भिडलेल्या घराच्या किमती पाहता, हे स्वप्न पूर्ण करणं अनेकांना जमत नाही. एका मराठी अभिनेत्रीचं मात्र मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. अभिनेत्री मीरा जोशीने मुंबईत तिचं स्वत:चं घर घेतलं आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर अभिनेत्रीने तिच्या मुंबईतील घरात गृहप्रवेश केला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

मीरा जोशीने १३व्या मजल्यावर घर घेतलं आहे. ती म्हणते, "१३ हा नंबर माझ्या खूप जवळचा आहे. माझी जन्मतारीख १३. माझ्या फ्लॅट चा फ्लोअर नंबर १३ च आणि फ्लॅट नंबरसुद्धा १३ च. हा निव्वळ योगायोग नाही; जणू काही युनिव्हर्स मला येथे आणण्यासाठी एकवटलं होतं असं म्हणावं लागेल. म्हाडाचे हे सगळं गणित जुळवून आणल्याबद्दल आभार! मुंबईत फ्लॅट असावा हे स्वप्न मी गेली पंधरा वर्षे उराशी बाळगून होते. कारण हीच आता माझी कर्मभूमी आहे. १५ वर्षांपूर्वी मुंबईत आले. मुंबईने आपलंसं केलं. अर्थात मुंबई सर्वांनाच आपलं करून घेते. इतकी वर्षे भाड्याच्या घरात राहिले. भाड्याच्या घरातही चांगले दिवस गेले. कोणत्याच घरमालकाने कधी खाली करा सांगितले नाही. पण स्वतःचं असं एक घर असावं असं कोणाला वाटत नाही!" 

पुढे मीराने सांगितलं की "माझा स्वभाव उधळा नसल्याने माझं पंधरा वर्षांच थोडंफार सेव्हिंग होतं. माझ्या दादाचं सलील जोशी योग्य सल्ला असल्याने पै आणि पै अगदी योग्य ठिकाणी सेव्ह झाली होती. पण ती रक्कम एक फ्लॅट घेण्यासाठी पुरेशी नव्हती. फ्लॅट घेण्यासाठी पालक देऊ करत असलेली मदत मी नम्रपणे नाकारली खरी पण अडचण अशी आली की या क्षेत्रामधील लोकांना बँका लोन देत नाहीत. कारण आमचा ठोस असा इन्कम नसतो. मग बाबांनी माझं फर्स्ट नाव आणि त्यांचं सेकंड नाव , असं महाराष्ट्र बँकेचे होम लोन करून दिले. फायनली माझं आज घर झालं. खरंतर हे वर्ष धाडसाचं होतं. चॅलेंजिंग होतं. स्वप्नांना योग्य दिशा देणार होतं म्हटलं तरी चालेल. माझं प्रॉडक्शन हाऊस ’कृष्णसखी’ मी याच वर्षी सुरु केलं आणि घर घेण्याचा योगसुद्धा याच वर्षी आला". 

"माझ्या आईने नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूल्यांशी कोणतीही तडजोड न करता स्वतःच्या अटींवर काम करण्यास प्रवृत्त करणं असो. माझ्या आईमुळेच रत्नागिरीतील एक मुलगी स्वप्नांच्या शहरात मोठी स्वप्ने पाहू शकली.अर्थात प्रत्येक प्रोफेशन मध्येच आपापल्या परीने संघर्ष असतो. तसा तो मी पण केला त्यात काही मोठे केलं असं मला वाटत नाही. माझे आई-बाबा, माझा दादा, माझा मित्र दुर्गेश, माझा मामा, पूनम मामी आणि माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्व प्रेक्षक मायबाप या सर्वांचे आभार माझ्या चढत्या आलेखासाठी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझी काळजी घेतल्याबद्दल आणि चढ-उतारांमध्ये मला मार्गदर्शन केल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. तो माझ्यासोबत सदैव असणार आहे मला त्याची खात्री आहे", असं म्हणत मीराने तिच्या या प्रवासात सोबत असलेल्या सगळ्यांचे आभार मानले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi actress fulfills 15-year dream, buys Mumbai home despite loan hurdles.

Web Summary : Marathi actress Meera Joshi realized her 15-year dream by purchasing a Mumbai home. Facing loan rejections due to inconsistent income, her father helped secure a loan. She expressed gratitude to her family and fans for their support.
टॅग्स :मीरा जोशीटिव्ही कलाकार