Manasi Kulkarni: सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर करणारे लाखो-करोडो यूजर्स आहेत. या माध्यमाने जवळजवळ प्रत्येक क्षेत्र व्यापलं आहे. त्यामुळे हल्ली सोशल मीडियावर किती ‘लाइक्स’, ‘शेयर्स’,‘कमेन्ट्स’ आणि ‘फॉलोअर्स’ आहेत याला फार महत्त्व आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वात गेल्या काही काळापासून सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून काम देण्याचा नवीन प्रकार उदयास आला आहे. ज्याचे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स त्याची भूमिकेसाठी निवड केली जाते. बऱ्याचदा यावर अनेक कलाकार बोलेल आहेत. अशातच मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी कुलकर्णीने या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
अलिकडेच मानसी कुलकर्णीने 'सर्वकाही' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यादरम्यान, अभिनेत्रीला हल्ली सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून काम दिलं जातं का? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली,"हो, हे मी सुद्धा अनुभवलं आहे. मला कोणाचीही नावे घ्यायची नाहीत. पण, अलिकडेच मला एका मराठी सिनेमासाठी फोन आला. ज्या इंडस्ट्रीतील लोकांनी माझं आजवरचं काम पाहिलं त्यांच्याकडून ऑफर आली. त्यांनी माझ्याकडून ऑडिशन मागितलं. मी ती ऑडिशन दिली कारण,माझा या सगळ्या प्रोसेसकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. मला असं वाटतंय ना की मी ती भूमिका करू शकेन. पण, समोरच्या व्यक्तीला जर असं वाटत असेल तर की या विशिष्ट व्यक्तिरेखेसाठी ही योग्य आहे की नाही. या गोष्टी पडताळून पाहण्याचा पूर्ण हक्क आहे, असं मला वाटतं."
मग अभिनेत्री म्हणाली,"तर त्या सिनेमाच्या ऑडिशनबद्दल मी त्यांना विचारलं. तर ते म्हणाले, सगळं ठीक आहे. आता पुढे चॅनेककडून काय फीडबॅक येतोय ते आपण बघूया. आम्हाला तुमचं काम आवडलंय पण आता नंबर्स वगैरे कसे वर्कआऊट होतायेत ते पाहूया.मला ते कळलं नाही म्हणून मी त्यांना नंबर्स म्हणजे काय, मग मी त्यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, कुणाचे किती फॉलोअर्स असतात, याबद्दल चॅनल विचार करतं."
खूप फॉलोअर्स असलेल्यांचे सिनेमे देखील आपटलेत...
त्यानंतर मानसी म्हणाली,"पण, एखाद्या व्यक्तीचे जितके फॉलोअर्स असतील ती व्यक्ती तुम्हाला तितक्या चांगल्या पद्धतीचं काम करेल याची खात्री आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे जर त्या व्यक्तीचे खूप असतील तर ती व्यक्ती तुम्हाला थिएटर हाऊसफुल करून देईल याची गॅरंटी आहे का केवळ तुमचे फॉलोअर्स खूप असल्याने तुम्ही कलाकार म्हणून चांगले होता का तर त्याचं उत्तर नाहीच आहे. कारण, फॉलोअर्स हा त्याचा निकष नाही आहे. कॅमेरासमोर पंधरा-वीस सेकंदाचा कन्टेंट क्रिएट करणं आणि चित्रपटातील अख्खा सीन पेलवणं यात खूप तफावत आहे. आता मला टीव्हीवर काम करता येत. याचा अर्थ असाही होत नाही की मला चांगला कन्टेंन्ट क्रिएट करता येईल. ते माझं कामंच नाही. मला तुम्ही पाच मिनिटांचा सीन द्या, मी तो कसाही तो करेन. या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. पण, कास्टिंगवाल्यांना या गोष्टी का कळत नाही.याआधी खूप फॉलोअर्स असलेल्यांचे सिनेमे देखील दणदणीत आपटले. अशीही आपल्याकडे उदाहरणं आहेत."असं स्पष्ट मत अभिनेत्रीने व्यक्त केलं.
Web Summary : Marathi actress Manasi Kulkarni criticizes casting based on social media followers. She argues that online popularity doesn't equate to acting ability, citing examples of films with high-follower actors failing. Kulkarni emphasizes the difference between creating short online content and performing in a full-length film.
Web Summary : मराठी अभिनेत्री मानसी कुलकर्णी ने सोशल मीडिया फ़ॉलोअर्स के आधार पर होने वाली कास्टिंग की आलोचना की है। उनका कहना है कि ऑनलाइन लोकप्रियता अभिनय क्षमता के बराबर नहीं है। उन्होंने ज़्यादा फ़ॉलोअर्स वाले अभिनेताओं की फ़िल्में असफल होने के उदाहरण दिए। कुलकर्णी ने ऑनलाइन कंटेंट और फ़िल्म में अभिनय के अंतर पर ज़ोर दिया।