Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठीतली सुपरहॉट अन् फिट खलनायिका! माधवी निमकर स्वत:ला 'अशा' प्रकारे ठेवते फिट, न चुकता करते 'ही' गोष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:38 IST

माधवी निमकरच्या फिटनेसचं रहस्य काय, अशी आहे अभिनेत्रीची दिनश्चर्या, म्हणते-"रोज सकाळी उठून मी..."

Madhavi Nimkar: माधवी निमकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. माधवीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'स्वप्नांच्या पलीकडले', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये ती झळकली आहे. सध्या माधवी तुझ्या सोबतीने या नव्याकोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणारी ही नायिका तिच्या फिटनेससाठी सुद्धा तितकीच ओळखली जाते. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे. 

अलिकडेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये माधवीने तिचा डाएट प्लॅन शेअर केला. ती म्हणाली,"मला घरगुती जेवणं आवडतं.मी रोज सकाळी उठल्यावर ड्रायफ्रूट खाते किंवा एक दिवस फ्रुट खाते. त्यानंतर मी चहा पिते, तोही कमी प्रमाणात असतो. कारण, सेटवर आल्यावर मी स्ट्रॉंग कॉफी पिते. त्याच्यानंतर मी सकाळच्या वेळेस आठ-साडेआठ वाजता भूक लागली की ब्रेकफास्ट करते. घरी असो किंवा सेटवर असो मी नाश्ता करते, मग मी सेट असते.अगदीच वाटलं तर अकरा-साडे अकराच्या सुमारास मी फळं खाते. मग दीड वाजता ब्रेक होतो. त्यावेळे माझं जेवण होते. नंतर दोन-तीन तास मी काहीच खात नाही. मग परत साडेचार वाजले की माझा टी-ब्रेक असतो. मग माधवी म्हणाली, संध्याकाळी पाच-सहा वाजता काही खाल्लं तर ठीक नाहीतर मी थेट सात वाजता जेवायलाच बसते. त्यानंतर मी काहीच खात नाही. मग झोपून जाते."

भाताने खरंच वजन वाढतं का  त्या प्रश्नावर उत्तर देत माधवी म्हणाली,खरं सांगायचं झालं तर  भात खाल्ल्याने काही होत नाही. पण, प्रत्येक गोष्ट प्रमाणात खाल्ली पाहिजे. तुम्ही जर एकदम ३-४ पोळ्या खाताय आणि मग त्यावर भात खाल्ला तर आपसूकचं तुमचं वजन वाढेलं. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात भात खाल्ला तर नक्कीच वजन वाढणार आहे. मला योग्य त्या वेळेत जेवायला आवडतं. कारण, तुम्ही कितीही पौष्टिक आहार घेत असाल आणि वेळेत जेवत नसाल तर त्याचा उपयोग नाही. 

वजन कमी करण्यासाठी माधवीने दिल्या टिप्स, म्हणाली...

यावेळी माधवी म्हणाली,"मी दोन गोष्टी सांगते, साखर खाणं बंद करा. साधारण दोन चमचे साखर आपल्या शरीराला चालते, ती आपल्याला जेवणातून मिळते. पण,जास्त प्रमाणात गोड खाणं टाळा.  त्याचबरोबर रोज किमान १ तास चाललं पाहिजे. याव्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही. शिवाय साधारण ३ लिटर तरी पाणी प्यायलं पाहिजे, मी सुद्धा सतत पाणी पिते. चांगली त्वचा आणि फॅटलॉससाठी हे उपयुक्त आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi Actress Madhavi Nimkar's Fitness Secrets Revealed!

Web Summary : Marathi actress Madhavi Nimkar shares her fitness regime, emphasizing home-cooked food, timely meals, and portion control. She advises cutting sugar, walking daily, and drinking plenty of water for weight loss and healthy skin.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीफिटनेस टिप्स