Yed Lalgla Premach: छोट्या पडद्यावरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. सध्या ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. कथानकात दररोज नवे ट्विस्ट आणि रहस्य उलगडत असताना प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवणारी एक खास एन्ट्री मालिकेत होणार आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी छाप पाडलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे-विज आता या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे मालिका रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नुकतीच ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत जीजींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची एक्झिट झाली. त्यानंतर मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होत आहे. या मालिकेत अभिनेत्री किशोरी शहाणेंची वर्णी लागली आहे. किशोरी शहाणे-विज या मालिकेत इंद्रायणी धर्माधिकारी हे पात्र साकारणार आहेत. इंद्रायणी धर्माधिकारी या पोलीस स्पेशल सेलच्या हेड असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गुंतागुंतीच्या केसेस यशस्वीपणे सोडवल्या आहेत. अत्यंत करारी, स्पष्टवक्ती आणि धाडसी स्वभाव असलेल्या इंद्रायणी तितक्याच संवेदनशील आणि प्रेमळही आहेत. कोणतीही परिस्थिती असो, कितीही अडथळे आले तरी त्यातून मार्ग काढण्याची त्यांची जिद्द आणि आत्मविश्वास त्यांना वेगळं ठरवतो. इंद्रायणी धर्माधिकारी यांच्या येण्याने रायाच्या आयुष्यात नेमकी काय उलथापालथ घडणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.
नीना कुलकर्णींनी घेतली एक्झिट...
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत जीजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी मालिका सोडली आहे. जीजीचा मालिकेतील प्रवास संपल्यामुळे नीना कुळकर्णींना 'येड लागलं प्रेमाचं'मधून एक्झिट घ्यावी लागली आहे. नीना कुळकर्णींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली होती.
Web Summary : ‘Yed Lagla Premacha’ welcomes Kishori Shahane Vij as Indrayani Dharmadhikari, a police special cell head, after Neena Kulkarni's departure. Her character is strong, outspoken, and brave, promising a major twist in Raya's life. Kulkarni cited the end of her character's arc as her reason for leaving.
Web Summary : नीना कुलकर्णी के जाने के बाद, 'येड लागला प्रेमाचा' में किशोरी शहाणे विज इंद्रायणी धर्माधिकारी के रूप में शामिल हुईं, जो एक पुलिस स्पेशल सेल की प्रमुख हैं। उनका चरित्र मजबूत, स्पष्टवादी और बहादुर है, जिससे राय के जीवन में एक बड़ा मोड़ आने की उम्मीद है। कुलकर्णी ने अपने किरदार के खत्म होने का हवाला दिया।