Join us

"तारक मेहता..."मधील अभिनेत्रीची 'आई कुठे काय करते' मालिकेत एंट्री, आशुतोषच्या बहिणीची भूमिका साकारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 10:56 IST

आशुतोषची बहीण वीणाची मालिकेत एंट्री होणार आहे. ते सुद्धा अनिरुद्धची बिझनेस पार्टवर बनून.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत सध्या ईशाच्या लग्नाची गडबड आहे. दरम्यान मालिकेत एक ट्विस्टही येणार आहे. आशुतोषची बहीण वीणाची मालिकेत एंट्री होणार आहे. ते सुद्धा अनिरुद्धची बिझनेस पार्टवर बनून. त्यामुळे आता वीणाचं कॅरेक्टर हे निगेटिव्ह असणार का असा अंदाज प्रेक्षकांनी वर्तवलाय. तसंच ही भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री खूशबू तावडे (Khushboo Tawde) साकारणार आहे.

'आम्ही दोघी' फेम अभिनेत्री खुशबू तावडे सध्या 'मेरे साई' या मालिकेत भूमिका साकारत आहे. तर आता तिला लोकप्रिय 'आई कुठे काय करते' मालिकेतही भूमिका साकरण्याची संधी मिळाली आहे. यासाठी ती खूपच उत्सुक दिसतीये. खुशबू गेल्या अनेक वर्षांपासून टेलिव्हिजन क्षेत्रात कार्यरत आहे. आता खुशबूच्या एंट्रीने मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. तिचं कॅरेक्टर निगेटिव्ह असणार का यासंबंधीची उत्सुकता ताणली आहे. तसंच तिच्या एंट्रीमुळे आशुतोष आणि अरुंधतीच्या नात्यात काही वादळ येईल का असाही प्रश्न चाहत्यांना पडलाय. आता मालिका नेमकं कोणतं वळण घेते हे लवकरच कळेल.

खुशबूने लोकप्रिय 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत बुलबुलची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं. तसंच तिने अनेक मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे. खुशबूने 'देवयानी' मालिकेतील अभिनेता संग्राम समेळ बरोबर लग्नगाठ बांधली आहे. दोघांना एक मुलगाही आहे. तर खुशबूची बहीण  तितीक्षा तावडे प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या तितीक्षा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारमधुराणी प्रभुलकरमराठी अभिनेता