Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही चिमुकली लोकप्रिय मालिकेत करतेय काम, प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर रिलेशनशिपमध्ये; तुम्ही ओळखलं मराठी अभिनेत्रीला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 16:04 IST

हिरवा फ्रॉक आणि हेअरबँड, फोटोत दिसणारी ही साधी मुलगी आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री; तुम्ही ओळखलं का?

आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांना आवडतं. सेलिब्रिटी कुठे राहतात? कुठून शॉपिंग करतात? अशा अनेक गोष्टींमध्ये चाहत्यांना रस असतो. अनेकदा सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसतात. अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत दिसणारी ही चिमुकली लोकप्रिय मराठी अभिनेत्री असून तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

फिलमवाला या इन्स्टाग्राम पेजवरुन लोकप्रिय अभिनेत्रीच्या लहानपणीचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये चिमुकलीने हिरव्या रंगाचा फ्रॉक घातला आहे. डोक्यावर लाल रंगाचा हेअरबँड लावला आहे. ही चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून जय मल्हार फेम अभिनेत्री ईशा केसकर आहे. ईशाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिला या फोटोत ओळखणं कठीण होत आहे. 'जय मल्हार' या मालिकेमुळे ईशा प्रसिद्धीझोतात आली होती. या मालिकेत तिने बानूबाई ही भूमिका साकारली होती. 

'जय मल्हार'नंतर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये ईशा दिसली. माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये शनायाच्या भूमिकेनेही तिला लोकप्रियता मिळवून दिली. अनेक सिनेमांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारून ईशाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'सरला एक कोटी', 'शेर शिवराज', 'शिवरायांचा छावा', 'हॉर्न ओके प्लीज', 'गर्लफ्रेंड' या मराठी सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. सध्या ईशा स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या मालिकेत ती कला हे पात्र साकारत आहे. ईशा सध्या 'काहे दिया परदेस' फेम अभिनेता ऋषी सक्सेनाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. 

टॅग्स :ईशा केसकरटिव्ही कलाकार