Join us
Daily Top 2Weekly Top 5

आली लग्नघटिका समीप..! ज्ञानदा रामतीर्थकरच्या हातावर सजली हर्षदच्या नावाची मेहंदी,लवकरच अडकणार विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 16:20 IST

ज्ञानदा रामतीर्थकरच्या घरी सुरु झाली लगीनघाई! लवकरच बांधणार लग्नगाठ, होणाऱ्या नवरीचा उत्साह पाहाच

Dnyanada Ramtirthkar Mehendi Ceremony: छोट्या पडद्यावरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर (dnyanadaramtirthkar).  सध्या गेले काही दिवस ज्ञानदा तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्रीने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री लवकरच हर्षद आत्मारामबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे.नुकतंच तिच्या घरी मेहंदी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या मेहंदी सोहळ्याचा खास व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.


काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने सिनेमॅटोग्राफर हर्षद आत्मारामसोबत साखरपुडा करत आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर अलिकडेच ज्ञानदाचं केळवण पार पडलं होतं. आता अभिनेत्रीच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. ज्ञानदा रामतीर्थकर आणि तिचा होणार नवरा हर्षद गेली सहा ते सात वर्ष  रिलेशनशिपमध्ये होते. आता हे दोघे आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे.

ज्ञानदा सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स यामार्फत चाहत्यांना देत असते. नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मेहंदी सोहळ्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्ञानदाच्या हातावर हर्षदच्या नावाची मेहंदी सजली आहे. आपल्या मेहंदी सोहळ्यासाठी ज्ञानदाचा साधा पण तितकाच लूक केल्याचा पाहायला मिळतोय. या व्हिडीओमध्ये ज्ञानदाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे झळकत आहे. 

दरम्यान, ज्ञानदा आणि हर्षदच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर २०१५ मध्ये एका शॉर्टफिल्मच्या शूटिंगदरम्यान ते  पहिल्यांदा भेटले. त्यावेळेस हर्षद मुंबईत राहत नव्हता.तो फक्त कामानिमित्त मुंबईत यायचा.हर्षद मुंबईतून तिला न भेटता गेला, की ज्ञानदाची चिडचिड व्हायची. इथूनच एका सुंदर नात्याची गुंफण सुरू झाली.त्यानंतर त्यांच्यामध्ये ओळख निर्माण झाली. २०१९ चं ते वर्ष या दोघांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं.एका मित्राच्या लग्नाला गेले असताना हर्षदने त्याच्या मनातील भावना ज्ञानदासमोर व्यक्त केल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Dnyanada Ramtirthkar's wedding nears! Harshad's name adorns her mehndi.

Web Summary : Actress Dnyanada Ramtirthkar, famed for 'Thipkyanchi Rangoli,' is set to marry Harshad Atmaram. Her mehendi ceremony recently took place. Dnyanada shared a video of the event, showcasing her joy as she embarks on this new chapter after a six-year relationship.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रेटी वेडिंगसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओ