Dipti Ketkar: सध्या सोशल मीडियाने संपूर्ण जग व्यापलेलं आहे. सर्वसामान्यांसह अगदी कलाकार मंडळी देखील या माध्यमाचा वापर करतात. तसेच अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बऱ्याचदा सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होतंच पण काहींना ट्रोंलही केलं जातं. एखादा फोटो, व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यावर कमेंट्स करण्यासाठी काही लोक टपलेलेच असतात. या ट्रोलिंगबाबत मराठी अभिनेत्रीने भाष्य केलं आहे. तसेच ती सोशल मीडियावर नवऱ्याबरोबरचे फोटो का शेअर करत नाही यामागचं कारणही सांगितलं आहे.
या अभिनेत्रीचं नाव म्हणजे दीप्ती केतकर. 'अवघाची संसार' या मालिकेतून दिप्तीने छोटया पडद्यावर पदार्पण केलं.पदार्पणाच्या मालिकेतच तिला मोठं यश मिळालं. तसंचदीप्तीने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं.नुकतीच दीप्ती केतकरने राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्यादरम्यान, ती ट्रोलिंगकडे फारसं लक्ष देत नाही, असंही तिने सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, जर कामाविषयी ट्रोलिंग केलं तर ठीक आहे. आजकाल सोशल मीडियामुळे असं झालं आहे की लोकांना कोणाबद्दलही बोलायचं असतं लिहायचं असतं. मात्र, तो माणूस त्यासाठी किती मेहनत घेतो आहे हे कोणाला माहित नसतं.आता आपल्या इंडस्ट्रीतील सगळ्यांबद्दल मला कौतुक वाटतं.कारण सगळे मेहनत करतात.आता माझ्या कामांविषयी ट्रोलिंग केलं तर ठीक आहे, पण कामापेक्षा माझ्या केसांबद्दल बोललं गेलं तर माझ्या पात्राला लोकप्रियता मिळते. त्यामुळे मी आनंदीच असते.
मग दीप्तीने म्हटलं, "कमला मालिकेच्या वेळी एका वर्तमानपत्रात माझ्याबद्दल चुकीचं लिहिलं गेलं होतं, तशी मी अजिबात नाही. त्यामुळे मला वाईट वाटलं होतं. तेव्हा मी लहान होते पण आता समजूतादरपणा आला आहे. अशा गोष्टींकडे दूर्लक्ष केलं पाहिजे.कारण, लोकं तर बोलणारच आहेत."
सोशल मीडियावर नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर करत नाही, कारण...
याचदरम्यान, सोशल मिडियावर नवऱ्याबरोबरचे फोटो का शेअर करत नाही. याबाबत बोलताना दीप्तीने म्हटलं,"त्याला आवडत नाही. 'एका पेक्षा एक' मध्ये त्याला, माझी आई आणि मायराला बोलावलं होतं. त्यानंतर किती लोकं त्याला ओळखायचे.त्याचं म्हणणं आहे की हे तुझं काम आहे, तुझं श्रेय आहे. ती तुझी मेहनत आहे. माझी मुलगी पण तशीच आहे. जरी एखादा फोटो मी पोस्ट केला तरी लगेच डिलिट करते. लोकं म्हणतात रोमित आणि मायराचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही. आईचा टाकते. पण, त्या दोघांनाही आवडत नाही. आम्ही कॅमेऱ्याच्या मागे बरे आहोत, असं ते म्हणत असतात."
याचमुलाखतीत एक मजेशीर गोष्ट शेअर करताना ती म्हणाली, "कोणीतरी माझा फोटो कोणत्यातरी भलत्याच कलाकाराबरोबर शेअर केला होता. तेव्हा मी सांगितलंह होतं, अरे... हा माझा नवरा नाही. गणपतीच्यावेळी एकदा मुलाखतीसाठी लोक घरी आले होते. तेव्हा तो म्हणाला, फक्त दीप्तीचं आणि देवाचं शूटिंग घ्या. बाकी काहीच नाही.त्यामुळे मी खरंतर घरी मुलाखत देत नाही, कारण मला ती प्रायव्हसी आवडते." असं वक्तव्य अभिनेत्रीने मुलाखतीत केलं.
Web Summary : Dipti Ketkar revealed she avoids sharing photos with her husband on social media because he values privacy and prefers to stay out of the spotlight, supporting her career from behind the scenes.
Web Summary : दीप्ति केतकर ने खुलासा किया कि वह सोशल मीडिया पर अपने पति के साथ तस्वीरें साझा करने से बचती हैं क्योंकि वह गोपनीयता को महत्व देते हैं और पर्दे के पीछे से उनके करियर का समर्थन करते हुए सुर्खियों से दूर रहना पसंद करते हैं।