Join us
Daily Top 2Weekly Top 5

वहिनीसाहेबांसह युवराजांचा राजेशाही थाट; धनश्री काडगांवरकरचं लेकासोबत रॉयल फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 17:50 IST

Dhanashri kadgaonkar: धनश्रीने बाळाला जन्म दिल्यापासून त्याच्यासोबतचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर (dhanashri kadgaonkar).  'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत नंदिता वहिनी अर्थात वहिनीसाहेब ही भूमिका साकारुन तिने खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवली. धनश्रीने अलिकडेच एका गोड बाळाला जन्म दिला असून सध्या ती त्याच्या संगोपनामध्ये बिझी आहे. त्यामुळेच तिने कलाविश्वातील वावर कमी केला आहे. मात्र, या काळात ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

धनश्रीने बाळाला जन्म दिल्यापासून त्याच्यासोबतचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यात काही खास व्हिडीओंचादेखील समावेश आहे. अलिकडेच धनश्रीने एक नवं व्हिडीओशूट आणि फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा लाडका लेक कबीर दिसून येत आहे. धनश्रीने खास तिच्या बाळासोबत हा व्हिडीओशूट केला आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये धनश्री आणि तिच्या बाळाने मॅचिंग रंगाचे कपडे परिधान केले आहेत. धनश्रीने पिवळ्या रंगाची काठपदराची साडी नेसली असून त्यावर मराठमोळ्या पद्धतीने साजशृंगार केला आहे. तर, कबीरला तिने छब्बा आणि धोतर घातलं आहे. सध्या या माय-लेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :धनश्री काडगावकरटेलिव्हिजनसेलिब्रिटी