Join us
Daily Top 2Weekly Top 5

“देवा, तू माझी आई का नेलीस?”, लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला मातृशोक; घरातील आधार हरपला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 17:09 IST

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर! प्रदीर्घ आजाराने आईचं निधन, शेअर केली काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट 

Marathi Actress Bhagyashree Nhalv:  मराठी मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे.  'कुंकू टिकली आणि टॅटू', 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' तसंच  'माटी से बंधी डोर' या मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवेच्या आईचं निधन झालं आहे. भाग्यश्रीने स्वत: इन्स्टाग्रामवर आईसोबतचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. भाग्यश्रीच्या आईच्या निधनानंतर मराठी कलाविश्वातून दु:ख व्यक्त केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवेच्या आईचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले असून, गेल्या वर्षभरापासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. मात्र, गेल्या आठवड्यात अचानक तिच्या आईची तब्येत अधिकच खालावली. ही बाब कळताच भाग्यश्री मुंबईहून तातडीने पुण्यात दाखल झाली.  आईच्या जाण्याने भाग्यश्री पूर्णपणे कोलमडून गेली आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आईसोबत फोटो शेअर करत त्याला भावुक कॅप्शन देत तिने म्हटलंय,  “देवा, तू माझी आई का नेलीस?” या शब्दांतून तिच्या मनातील असह्य वेदना स्पष्टपणे जाणवतात.भाग्यश्रीची ही पोस्ट पाहून चाहतेही हळहळले आहेत. 

भाग्यश्री आणि तिच्या आईचं नातं फार खास होतं. अनेकदा ती तिच्या आईबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसायची. भाग्यश्रीच्या या अभिनय कारकीर्दीत आईने तिला खूप सपोर्ट केला होता. अभिनेत्रीच्या आईच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

भाग्यश्री न्हाळवेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्रीने मराठीसह हिंदी  मालिकाविश्व देखील गाजवलं आहे. 'कुंकू टिकली आणि टॅटू', 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' तसंच  'माटी से बंधी डोर' या हिंदी मालिकेतही ती झळकली आहे.'तान्हाजी'च्या निमित्ताने अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेला अजय आणि काजोलसोबत काम करण्याची संधी मिळाली.'तान्हाजी'मध्ये भाग्यश्रीने सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Actress Bhagyashree Nhalve's mother passes away, family mourns the loss.

Web Summary : Marathi actress Bhagyashree Nhalve's mother passed away after a prolonged illness. The actress shared a heartfelt message on Instagram, expressing her grief. The entertainment industry mourns the loss and remembers the mother's support for her daughter's career.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया