Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्ही आयुष्यभरासाठी...'अश्विनी महांगडेने केलं होतं 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या दिग्दर्शकांना प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 13:43 IST

Ashwini Mahangde: अश्विनीने आयुष्यात पहिल्यांदाच एका व्यक्तीला प्रपोज केलं होतं. विशेष म्हणजे या व्यक्तीनेही तिला होकार दिला.

अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते'. या मालिकेने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात घर केलं आहे. त्यामुळे मालिकेतील बरेचसे कलाकार कायम चाहत्यांच्या चर्चेमध्ये असतात. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे (Ashwini Mahangde). मालिकेत अनघाची भूमिका साकारुन अश्विनी विशेष लोकप्रिय झाली. अलिकडेच अश्विनीने लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने पहिल्यांदा एका व्यक्तीला प्रपोज केल्याचं मान्य केलं.

अश्विनीने आयुष्यात पहिल्यांदाच एका व्यक्तीला प्रपोज केलं होतं. विशेष म्हणजे या व्यक्तीनेही तिला होकार दिला. साधारणपणे एखादा मुलगा किंवा मुलगी एकमेकांना प्रपोज करतात. मात्र, अश्विनीने तिच्या गुरुंना प्रपोज केलं होतं. परंतु, हे प्रपोज प्रेमाचं नसून शिक्षणाचं होतं.

"आयुष्यात तू पहिल्यांदा कोणाला प्रपोज केलं असा प्रश्न अश्विनीला विचारण्यात आला. त्यावर, प्रपोज डेला मी पहिल्यांदाच कोणाला तरी प्रपोज केलं.स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे दिग्दर्शक आणि आता माझे गुरु विवेक देशपांडे यांना प्रपोज केलं होतं. 'तुम्ही आयुष्यभरासाठी माझे गुरु व्हाल का?' असं मी त्यांना प्रपोज केलं. तेही मालिकेच्या सेटवर असलेल्या आई भवानी मातेच्या मंदिरासमोर गुडघ्यांवर बसून हातात गुलाबाचं फूल घेऊन हे प्रपोज केलं", असं अश्विनी म्हणाली.

पुढे ती म्हणते, "ही माझ्या आयुष्यातली खूप छान आठवण आहे. साधारणपणे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड एकमेकांना प्रपोज करतात. मात्र, मी माझ्या आयुष्यातल्या अशा माणसाला प्रपोज केलं आणि त्याच्यासोबत आयुष्यभरासाठी माझं नातं बांधून घेतलं."

दरम्यान, अश्विनीने या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. यात तिचा फसलेला पहिला पदार्थही तिने सांगितला. तसंच तिच्या आईने तिच्यावर कसे संस्कार केले याविषयीदेखील ती व्यक्त झाली. 

टॅग्स :अश्विनी महांगडेटेलिव्हिजनसेलिब्रिटी