Join us

'दोनों तुझपे कुर्बान है...'; अश्विनी कासारची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 20:12 IST

Ashwini kasar: अश्विनीने या फोटोला दिलेल्या कॅप्शनचा काही खास अर्थ आहे का? असाही प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण होत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासार (ashwini kasar). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अश्विनी आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अश्विनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामध्ये अलिकडेच तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

अश्विनीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती जमिनीवर बसली असून तिने नजर रोखली आहे. या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन सगळ्यांचं लक्ष खेचून घेत आहे. इतंकच नाही तर अनेकांनी या कॅप्शनचा काही खास अर्थ आहे का? असाही प्रश्न विचारला आहे.

"एक दिल है एक जान है, दोनों तुझपे कुर्बान है.. एक मैं हूँ एक ईमान है, दोनों तुझपे हाँ तुझपे. दोनों तुझपे कुर्बान है एक दिल है..", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, अश्विनी अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगना आणि लेखिकादेखील आहे. अश्विनीने 'सोयरे सकळ' या नाटकातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. 'एक होती माळीण' या चित्रपटातही ती झळकली होती. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा