Rasika Wakharkar: मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये इंडस्ट्रीतील बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले. तर काहींनी सोशल मीडियावर नात्याची कबुली देत, त्यांचं नातं जगजाहिर केलं. अशातच येत्या काही दिवसांतही मराठी कलाविश्वातील कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळणार आहे. या नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकणार आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री रसिका वाखारकर.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अशोक मा.मा मालिकेतून घराघरात पोहोचलेली रसिका वाखारकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीच्या घरी लग्नाच्या विधींना सुरुवातही झाली आहे.नुकताच तिचा ग्रहमख सोहळा पार पडला. त्याचे फोटो अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.रसिका लवकरच शुभंकर उंब्रानीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. ग्रहमख विधीसाठी रसिकाने नारंगी रंगाची साडी नेसली होती. ज्यावर चंद्रकोरची डिझाइन आहे. तसंच या सुंदर साडीवर तिने मोजके दागिने परिधान केले होते आणि गजरा घातला होता. जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत कौमुदीचा ग्रहमख सोहळा पार पडला.
२०२५ वर्षा अखेरीस रसिका वाखारकरने चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर तिचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर करून अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. तेव्हापासून रसिकाच्या लग्नाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता लवकरच प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री बोहल्यावर चढणार आहे.
रसिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 'तुझ्या पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे रसिका वाखारकर. रसिका अलिकडेच 'अशोक मा.मा.' या मालिकेत पाहायला मिळाली. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
Web Summary : Marathi actress Rasika Wakharkar, known for 'Ashok Ma.Ma', is soon getting married to Shubhankar Umbrani. Pre-wedding rituals have begun, with the 'Grahmukh' ceremony recently held. She shared photos on social media, confirming the happy news after her engagement last year.
Web Summary : मराठी अभिनेत्री रसिका वाखारकर, 'अशोक मा.मा' के लिए जानी जाती हैं, जल्द ही शुभंकर उंब्रानी से शादी कर रही हैं। शादी से पहले के रीति-रिवाज शुरू हो गए हैं, हाल ही में 'ग्रहमख' समारोह आयोजित किया गया। उन्होंने सोशल मीडिया पर तस्वीरें साझा कीं, पिछले साल अपनी सगाई के बाद खुश खबर की पुष्टि की।