'रंग माझा वेगळा' मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेची चांगलीच चर्चा झाली. 'रंग माझा वेगळा' मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांंचं चांगलंच प्रेम मिळालं. याच मालिकेतील अभिनेत्री अनघा भगरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अनघाच्या भावाचं नुकतंच लग्न झालं. या लग्नात अनघाने तिच्या आजीसोबत 'झिंगाट' गाण्यावर खास डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
अनघाचा आजीसोबत झिंगाट डान्स
अनघाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत अनघा नाचत असून तिच्या मागे लाउड स्पीकरवर 'झिंगाट' गाणं वाजताना दिसतंय. अनघा आजीसोबत थिरकताना दिसतेय. अनघाचा हा व्हिडीओ अल्पावधीत व्हायरल झाला असून तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दिलीय. कडक, फॅब्यूलस अशा कमेंट करुन नेटकऱ्यांनी या व्हिडीओचं कौतुक केलंय.
अनघाचं वर्कफ्रंट
अनघा भगरेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 'अनन्या' नाटकातून अनघा सुरुवातीला प्रसिद्धीझोतात आली. नंतर अनघाला 'रंग माझा वेगळा', 'दिल दोस्ती दोबारा' मालिकेत अभिनय करण्याची संधी मिळाली. अनघाने 'रंग माझा वेगळा' मालिकेत साकारलेल्या खलनायकी भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं. सध्या अनघा प्रशांत दामलेंसोबत 'शिकायला गेलो एक' नाटकात अभिनय करतेय. अनघाच्या या नाटकाची सध्या खूप चर्चा आहे.