Join us

तुम बस हाथ थामे रखना!!! होणाऱ्या मिसेस जोशीबाईंचा हार्दिकसाठी खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 18:17 IST

Akshaya deodha: सध्या सोशल मीडियावर हार्दिक आणि अक्षयाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला असून तिने हार्दिकसाठी हा खास तयार केला आहे.

'तुझ्यात जीव रंगला' असं म्हणत एकमेकांसोबत साताजन्माची गाठ बांधण्याचा निर्णय घेतलेली जोडी म्हणजे अक्षया देवधर (akshaya deodha) आणि हार्दिक जोशी (hardeek joshi). अलिकडेच या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. तेव्हापासून या जोडीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच अक्षया आणि हार्दिकने या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच आता या सोहळ्याच्या फोटोज् आणि व्हिडीओनंतर अक्षयाने खास हार्दिकसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने त्यांचे काही खास फोटो कोलाज केले आहेत.

सध्या सोशल मीडियावर हार्दिक आणि अक्षयाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला असून तिने हार्दिकसाठी हा खास तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षयाने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेपासून त्यांच्या एंगेजमेंटपर्यंतचे अनेक फोटो कोलाज केले आहेत. तसंच 'तुम बस हात थामे रखना', हे गाणे बॅकग्राऊंडला सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, 'तुझ्यात जीव रंगला'  या मालिकेच्या माध्यमातून ही जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत अक्षयाने पाठकबाई तर, हार्दिकने राणादा ही भूमिका साकारली होती. या पहिल्याच मालिकेतून या जोडीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे या जोडीला रिल लाइफसोबतच रिअल लाइफमध्येही एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. विशेष म्हणजे या जोडीने चाहत्यांचं हे स्वप्न खरं करु त्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीसेलिब्रिटीटेलिव्हिजन