Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या ऐश्वर्या नारकर झाल्या बंगाली, ऐन पन्नाशीतील सौंदर्य पाहून नेटकरी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 16:33 IST

नवीन प्रोजेक्टबरोबरच अनेकदा ऐश्वर्या या रील्सही शेअर करताना दिसतात. आतादेखील त्यांनी इन्स्टाग्रामवरुन एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी बंगाली लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.

ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. गेली कित्येक दशकं त्या प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी सिनेसृष्टीला दिले आहेत. कधी सोशिक सून तर कधी सशक्त स्त्री तर कधी खलनायिका अशा विविधांगी भूमिका साकारून त्यांनी अभिनयाच्या छटा दाखवल्या. सगळ्याच भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी त्यांना पसंत केलं. त्यांचा चाहता वर्ग मोठा असून त्या सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

नवीन प्रोजेक्टबरोबरच अनेकदा ऐश्वर्या या रील्सही शेअर करताना दिसतात. आतादेखील त्यांनी इन्स्टाग्रामवरुन एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी बंगाली लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. बंगाली पद्धतीने त्यांनी हिरव्या रंगाची साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे. मराठमोळ्या ऐश्वर्या यांचा हा बंगाली लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. "बंगाली लूक केला असला तरी मन मात्र मराठीच आहे", असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलं आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

ऐश्वर्या यांचा हा लूक मालिकेतील आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत ऐश्वर्या नारकर विरोचकाच्या भूमिकेत होत्या. या मालिकेत विरोचकाचा अंत झाल्यानंतर आता त्या नव्या भूमिकेत दिसणार आहेत. विरोचकानंतर आता या मालिकेत त्या मैथिली हे खलनायिकेचं पात्र साकारताना दिसणार आहेत. मालिकेतील या नव्या ट्विस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.  

टॅग्स :ऐश्वर्या नारकरटिव्ही कलाकार