Join us

VIDEO: "Old songs वातावरण...", लोकप्रिय हिंदी गाण्यावर ऐश्वर्या नारकर अन् अश्विनी कासारचा सुंदर डान्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 18:29 IST

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नुकताच सोशल मीडियावर सुंदर  व्हिडीओ शेअर केला आहे.

Aishwarya Narkar Video:ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असं नाव आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या त्या अभिनयाच्या जोडीने सोशल मीडियावरील व्हायरल गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवत असतात. त्यांचे सोशल मीडियावरील व्हिडीओ अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. महत्वाची बाब म्हणजे चाहतेदेखील त्यांच्या व्हिडीओंवर पसंती दर्शविताना दिसतात. नुकतात अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओ एक लोकप्रिय चेहरा सुद्धा पाहायला मिळतोय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री अश्विनी कासार दिसते आहे. 'ओ मेरे सोना रे' या आशा भोसलेंनी गायलेल्या गाण्यावर या दोघींनी सुंदर असा डान्स केला आहे. शिवाय त्यांचे हावभाव देखील नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.  त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "Old songs वातावरण...", असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.  दरम्यान, या व्हिडीओमधील ऐश्वर्या नारकर आमि अश्विनी कासारची एनर्जी पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. ऐश्वर्या-अविनाश यांच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसचा पाडलाय."खूप छान मॅम...", "मला तुम्ही खूप आवडता...", अशा कमेंट करत यूजर्स त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकरटिव्ही कलाकारसोशल मीडिया