Join us

केसांमध्ये फूल माळलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? मराठीसह हिंदी कलाविश्वावर करतीये राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 14:43 IST

Marathi actress: सोशल मीडियावर एका अभिनेत्रीने तिच्या समर व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.

सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे आज सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण या माध्यमाचा प्रभावीपणे वापर करत असतो. यात खासकरुन सेलिब्रिटी या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर एका अभिनेत्रीने तिच्या समर व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने एक पाठमोरा फोटो शेअर केला आहे. यात तिने तिच्या केसात माळलेली फूलं फ्लॉण्ट केली आहेत. विशेष म्हणजे हा फोटो पाहिल्यावर ती कोण असावी याचा तर्कवितर्क नेटकरी लावतांना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला फोटो लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचा आहे. अभिज्ञा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असते. One summer day असं म्हणत तिने या पोस्टमध्ये तिचे काही निवडक फोटो शेअर केले आहेत.

दरम्यान, अभिज्ञाने मराठीसह हिंदी मालिका विश्वातही तिचं नशीब आजमावलं आहे. सध्या एका लोकप्रिय हिंदी मालिकेत ती काम करतांना दिसून येत आहे. या मालिकेच्या सेटवरचे अनेक फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

टॅग्स :अभिज्ञा भावेसेलिब्रिटीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन