Join us
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव चिमुकली हत्या प्रकरण! अभिज्ञा भावेची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली-"लक्षात ठेवा हा नराधम…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 08:56 IST

"याची कल्पनाच...", मालेगाव अत्याचार प्रकरणी अभिज्ञा भावेने व्यक्त केला संताप, शेअर केली पोस्ट

Abhidya Bhave Post About Malegaon case :नाशिकच्या मालेगावमधील डोंगराळे येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून  तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे.सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध होत असून अनेकांना आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. या घटनेचं वृत्त सुन्न करणारं आहे. मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. 

मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव तसेच सुरभी भावे या कलाकारांनी या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला.त्यानंतर आता अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने या घटनेचा निषेध करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. नुकतीच अभिज्ञा भावेने सोशल मीडियाव पोस्ट शेअर करत मालेगावमधील चिमुरडीवरील अत्याचाराबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे."मी याची कल्पनाच करू शकत नाही !!! ...स्वतःच्या मुलांना शिस्त लावा... आम्ही काय कपडे घालायचे, आम्ही कशी संस्कृती जपायची, कशी स्वतःची रक्षा करायची ह्यावर lecture देऊ नका! लक्षात ठेवा हा नराधम मराठी होता! आता "....मालेगाव प्रकरणी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने हे परखड मत व्यक्त केलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्षाच्या मुलीसोबत अमानुष प्रकार झाला. सकाळपासून खेळणारी मुलगी सापडेना म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. शोध घेत असताना मुलगी गंभीर अवस्थेत सापडली, तिला रुग्णालयात नेले असता मृत्यू झाल्याचे समोर आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Malegaon Child Murder: Abhidnya Bhave's Outrage, Warns to Remember Perpetrator

Web Summary : Actress Abhidnya Bhave expressed outrage over the Malegaon rape and murder of a three-year-old girl. She condemned the heinous crime, urging people to focus on disciplining their children instead of lecturing women on culture and dress. The entire state is demanding justice.
टॅग्स :अभिज्ञा भावेनाशिकमालेगांवगुन्हेगारी