गेल्या काही दिवसांपासून मराठी टेलिव्हिजनविश्वातील लोकप्रिय कपल असलेल्या विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. विशाल आणि अक्षयाने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरुन त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर उत्तराखंडमधील गंगाघाटावर त्यांनी साखरपुडा केला. आता अक्षया आणि विशालने लग्नाच्या बेडीत अडकत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अक्षया आणि विशालने उत्तराखंड येथे असलेल्या त्रियुगीनारायण मंदिरात महादेवाच्या साक्षीने लग्नगाठ बांधली आहे.
उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात महादेव आणि पार्वती यांनी लग्न केलं होतं. अनेक नवी जोडपी तिथे लग्न करतात. त्याच मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने विशाल आणि अक्षयाने १० फेब्रुवारीला सप्तपदी घेत पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. याच दिवशी विशालचा वाढदिवसही होता. विशालने लग्नसोहळ्यातील काही खास क्षणांचा व्हिडीओ शेअर केला आहे. "चंद्रभागेसारखं प्रेम आपलं सखी, मी तुझ्यात सामावून जाईन...रुसली जरी तू रखुमाईसारखी, मी सावळा विठ्ठल होऊन जाईन...कायम तुझा रुसवा काढून, तुला आयुष्यभर मनवत राहीन", असं कॅप्शन देत विशालने लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या व्हिडीओवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नासाठी विशालने खास धोतर नेसलं होतं. तर अक्षयाने लेहेंगा परिधान केला होता. विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात विशालने त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. पण त्याच्या सुंदराचं नाव त्याने गुलदस्त्यात ठेवलं होतं. काही दिवसांपूर्वीच विशालने अक्षयाच्या प्रेमाची कबुली दिली. आता लग्न करत त्यांनी कायम एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Web Summary : Marathi actors Vishal Nikam and Akshaya Hindalkar married at Triyuginarayan Temple in Uttarakhand on February 10, which was also Vishal's birthday. They chose a simple ceremony at the temple where Lord Shiva and Parvati are believed to have married. The couple shared a video of their wedding on social media.
Web Summary : मराठी अभिनेता विशाल निकम और अक्षया हिंदलकर ने 10 फरवरी को उत्तराखंड के त्रियुगीनारायण मंदिर में शादी कर ली, जो विशाल का जन्मदिन भी था। उन्होंने उस मंदिर में एक साधारण समारोह चुना जहाँ भगवान शिव और पार्वती का विवाह हुआ माना जाता है। जोड़े ने सोशल मीडिया पर अपनी शादी का एक वीडियो साझा किया।