मराठी कलाविश्वात काही सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. अभिनेता सिद्धार्थ खिरीडही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सिद्धार्थने प्री वेडिंग फोटोशूटचे फोटो शेअर करत लग्नाची तारीख चाहत्यांना सांगितली होती. आज सिद्धार्थचा लग्नसोहळा पार पडणार आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींनाही सुरुवात झाली असून नुकतंच हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्याच्या हळदी समारंभाला मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. अभिनेत्री रश्मी अनपट हिने सिद्धार्थच्या हळदीचे खास फोटो शेअर केले आहेत.
हळदीसाठी सिद्धार्थ आणि त्याची होणाऱ्या पत्नीने खास लूक केला होता. सिद्धार्थने गुलाबी रंगाचा सूट आणि जॅकेट असा पेहराव केला होता. तर त्याच्या पत्नीने डिझायनर लेहेंगा घातला होता. सिद्धार्थ हळदीच्या रंगात रंगल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. हळदीआधी त्यांचा मेहेंदी सोहळाही पार पडला होता. सिद्धार्थच्या होणाऱ्या पत्नीचं नाव मैथिली भोसेकर असं असून ती पेशाने डॉक्टर आहे.
२०२४ मध्ये सिद्धार्थने मैथिलीला फिल्मी स्टाइलने प्रपोज करत प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर आता ते लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. सिद्धार्थने 'फ्रेशर्स', 'मुलगी झाली हो' या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या तो 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
Web Summary : Actor Siddharth Khirid is set to marry Dr. Maithili Bhosekar. Pre-wedding festivities, including the Haldi ceremony attended by Marathi celebrities, have begun. Siddharth, known for roles in 'Freshers' and 'Mulgi Jhali Ho,' currently stars in 'Muramba'.
Web Summary : अभिनेता सिद्धार्थ खिरीद डॉक्टर मैथिली भोसेकर से शादी करने जा रहे हैं। मराठी हस्तियों की मौजूदगी में हल्दी समारोह सहित शादी से पहले के उत्सव शुरू हो गए हैं। 'फ्रेशर्स' और 'मुलगी झाली हो' में भूमिकाओं के लिए जाने जाने वाले सिद्धार्थ फिलहाल 'मुरांबा' में हैं।