शिवसेना शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 'शिवाजी कोण होता?' या गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावरुन प्रकाशकाला शिवीगाळ करत धमकी दिली. याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर यावरुन वाद निर्माण झाला. संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना जीवेमारण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. आता मराठी अभिनेता श्रेयस राजे याने याप्रकरणी पोस्ट शेअर केली आहे.
श्रेयस राजेने इन्स्टाग्राम स्टोरीमधून संजय गायकवाड प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्याने त्याच्या अकाऊंटवरुन दोन स्टोरी शेअर केल्या आहेत. यातील पहिल्या स्टोरीमध्ये त्याने 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाबद्दल लिहिले आहे. "ही असते एका लेखणीची ताकद! या पुस्तकाला पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळवून दिल्याबद्दल मान्यवरांचे आभार. ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी जरुर वाचा", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्या स्टोरीतून त्याने या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केला आहे.
"आई बहिणीवरुन वाटेल तशा शिव्या देणारे स्वत:ला छत्रपती शिवाजी महाराजांचे 'वंशज' म्हणवतात. आणि हेच महाराष्ट्राच्या विधानभवनात लोकप्रतिनिधी म्हणून बसवलेले असतात! ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाी गोष्ट आहे. निषेध", असं श्रेयस राजेने म्हटलं आहे. श्रेयस हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. समाजातील विविध घटनांबद्दल श्रेयस त्याचं मत अगदी परखडपणे मांडत असतो.
Web Summary : Actor Shreyas Raje criticizes Shiv Sena MLA Sanjay Gaikwad for using abusive language and threats after an audio clip went viral regarding the book 'Shivaji Kon Hota?' Raje condemned the incident, calling it shameful for Maharashtra.
Web Summary : अभिनेता श्रेयस राजे ने शिवसेना विधायक संजय गायकवाड़ द्वारा 'शिवाजी कौन था?' पुस्तक पर गाली और धमकी देने की आलोचना की। ऑडियो वायरल होने के बाद राजे ने इस घटना को महाराष्ट्र के लिए शर्मनाक बताया।