Join us
Daily Top 2Weekly Top 5

शशांक केतकरच्या लेकाला पाहिलंत का? मुलाच्या वाढदिवशी अभिनेत्याने शेअर केले खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 12:52 IST

मुलाच्या वाढदिवसानिमित्त शशांकने खास पोस्ट लिहिली आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन लेकाचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

शशांक केतकर हा मराठी टेलिव्हिजनचा चॉकलेट बॉय आहे. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून शशांकला लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील श्रीच्या भूमिकेने त्याला घराघरात पोहोचवलं. शशांकचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातले अपडेट्स तो चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतो. आज शशांकच्या लेकाचा वाढदिवस आहे. 

मुलाच्या वाढदिवसानिमित्त शशांकने खास पोस्ट लिहिली आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन लेकाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शशांकने मुलाचे गोड क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत. "तू माझ्या आयुष्यातील आशेचा किरण आहेस. हॅपी बर्थडे ऋग्वेद", असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे. शशांकच्या मुलाचं नाव ऋग्वेद असं आहे. त्याच्या मुलाचा आज चौथा वाढदिवस आहे. शशांकने २०१७ मध्ये प्रियांकासोबत लग्न केलं. त्याची पत्नी पेशाने वकील आहे. अनेकदा शशांक त्याच्या पत्नीबरोबरचे आणि कुटुंबीयांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतो. 

'होणार सून मी ह्या घरची' मालिकेनंतर शशांक अनेक मालिकांमध्ये दिसला. सध्या तो स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. तर हिंदी वेब सीरिजमध्येही तो झळकला आहे. 

टॅग्स :शशांक केतकरटिव्ही कलाकारमराठी अभिनेता