Join us
Daily Top 2Weekly Top 5

"एका टेबलवर जेवायला बसलो तर...", संकर्षण कऱ्हाडेने सांगितला परदेशात चाहत्यांचा आलेला अनुभव, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 11:01 IST

"मलाच रूखरूख लागून राहिली...", संकर्षण कऱ्हाडेने सांगितला चाहत्यांचा आलेला अनुभव, काय घडलं?

Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून त्याने मराठी इंडस्ट्रीत स्वत ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या रंगभूमीवर त्याच्या 'कुटुंब कीर्रतन' हे नाटक जोरदार सुरु आहे. या नाटकामध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते देखील पाहायला मिळत आहेत. अशातच आता सोशल मीडियावर संकर्षण कऱ्हाडेने शेअर केलेली एक पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये त्याने परदेशात त्याला आलेला चाहत्यांचा अनुभव शेअर केला आहे. 

संकर्षण कऱ्हाडे सध्या आपल्या कामातून ब्रेक घेत परदेशात सहकुटुंब क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. त्यादरम्यान, अभिनेत्याला परदेशी चाहत्यांनी खास पत्र लिहून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. याबद्दल सांगताना अभिनेत्याने पोस्टमध्ये लिहिलंय, "असे भारी आपले प्रेक्षक …२ दिवस सुट्टी मिळाली म्हणून कुटुंबासोबत बाहेरगावी आलोय… एका टेबलवर जेवायला बसलो तर, पलिकडच्या टेबलवर ४ यंगस्टर्स बसले होते… मराठी, मध्येच हिंदी , ईंग्लिश सगळं बोलत होते… अधे मध्ये माझ्याकडे पहात होते… मी “त्यांनी मला ओळखलंय का नाही” हा अंदाज बांधत होतो आणि खरंतर “त्यांनी मला ओळखावं” अशी मनांत अपेक्षाही करतच होतो. जेवण झालं आणि ते निघून गेले. मी निघतांना हॉटेल च्या स्टाफ ने पत्रं आणून दिलं."

पुढे त्याने लिहिलंय, "जान्हवी आणि वेदांत यांनी अत्यंत सुंदर अक्षरांत त्यांचं म्हणनं पत्रातून माझ्यापर्यंत पोचवलं. मला त्या तरुणांच्या दोन्ही गोष्टिंचं कौतुक वाटलं… पहिली ; त्यांना मी कुटुंबासोबत आहे ही जाणीव पण होती आणि दुसरी; त्यांना व्यक्तं व्हावं असंही वाटलं … क्या ब्बात है … हे वाचुन आणि अनुभवून मीच त्यांचा फॅन झालो आणि आता मलाच रूखरूख लागून राहीलीये कि , मला त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता… तो राहीला. मित्रांनो I hope हि पोस्ट तुमच्यापर्यंत पोचेल … कधीतरी माझ्या नाटकाला या…! मला तुमच्यासोबत फोटो काढायचाय." अशी पोस्ट अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेतासोशल मीडिया