Join us
Daily Top 2Weekly Top 5

हळदी-कुंकवाचं नातं; फ्रेंडशीप डे निमित्त श्रेयससाठी संकर्षणची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 14:52 IST

Sankarshan karhade: संकर्षण सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून अलिकडेच त्याने श्रेयससोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले दोन दिग्गज अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade) आणि श्रेयस तळपदे (shreyas talpade). उत्तम अभिनयाच्या जोरावर या दोघांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मालिकेत या दोघांची मैत्री नेटकऱ्यांनी विशेष भावली आहे. विशेष म्हणजे ऑनस्क्रीन एकमेकांचे बेस्टफ्रेंड असलेल्या या दोघांमध्ये ऑफस्क्रीनदेखील तितकीच चांगली मैत्री असल्याचं पाहायला मिळतं. या अलिकडेच संकर्षणने श्रेयससाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

संकर्षण सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून अलिकडेच त्याने श्रेयससोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये या दोघांमधील उत्तम बॉण्डिंग दिसून येत आहे. विशेष म्हणजे या फोटोला त्याने दिलेलं कॅप्शन लक्ष वेधून घेणारं आहे.

"आम्ही दोघं दोस्तं मिळुन , सगळं जग जिंकु..असं पाहिजे नातं , हळद आणि कुंकु ..", असं म्हणत त्याने श्रेयसला फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये संकर्षणने मरुन रंगाचा शर्ट घातला आहे. तर, श्रेयसने पिवळ्या रंगाचा त्यामुळे त्याने दोघांनाही हळद-कुंकू असं संबोधलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनश्रेयस तळपदेटिव्ही कलाकार