Join us

'बाप्पासोबत मीही २१ मोदक खातो'; 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याने सांगितला मजेशीर किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 17:45 IST

Rohit parshuram:'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील अर्जुनने त्याच्या गणेशोत्सवाच्या काळातील जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.

संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत म्हणजे गणपती. सध्या सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण बाप्पाच्या सेवेमध्ये लीन झालेला दिसत आहे. यात अनेकांनी आपल्या बाप्पासोबतचे फोटो वा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु, 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील अर्जुनने त्याच्या गणेशोत्सवाच्या काळातील जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.

" मी मूळचा भोरचा आहे, तिथे खूप दणक्यात गणेश उत्सव साजरा केला जातो. पूर्वी गणेश उत्सवात जिवंत देखावे निर्माण केले जात असत, त्यात माझ्या भावाचाही सहभाग असायचा. मी लहानपणी नागपंचमीसाठी मातीचे नाग, बैल पोळ्यासाठी बैल, तसेच गणेश उत्सवासाठी छोटी गणपती मूर्ती ही बनवायचो, ती फार सुबक नसली तरीही छान असायची. तो आनंद काही वेगळाच असायचा. गणपतीत मी बाप्पासोबत २१ मोदक सुद्धा खातो. लालबागच्या राजावर माझी नितांत श्रद्धा असून बाप्पाची माझ्यावर खूप कृपा आहे असे मला मनोमन वाटते. सगळ्यांना माझ्याकडून गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा," असं रोहित परशुराम याने सांगितलं.

दरम्यान, अलिकडेच छोट्या पडद्यावर 'अप्पी आमची कलेक्टर' ही नवीन मालिका सुरु झाली आहे. अवघ्या काही भागांमध्येच ही मालिका लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत रोहित याने अर्जुन ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन