Join us

जबरदस्त!! पृथ्वीकला भेटण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी; व्हॅनिटी व्हॅनबाहेर फॅन्सचा कल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 10:35 IST

PRITHVIK PRATAP:पृथ्वीकने एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे ही गर्दी पाहून तो भारावून गेला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप (prithvik pratap). उत्तम अभिनयकौशल्य आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधणारा पृथ्वीक आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. केवळ तरुणीच नाही तर तरुणांमध्येही तो लाडका आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड स्टार्ससारखीच पृथ्वीकची एक झलक पाहता यावी यासाठी चाहते धडपड करत असतात आणि याच गोष्टीचा प्रत्यय नुकताच त्याला आला आहे.

पृथ्वीकने सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या व्हॅनिटी व्हॅनबाहेर चाहत्यांनी तुफान गर्दी केल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे पृथ्वीक देखील त्याच्या प्रत्येक चाहत्याची भेट घेत असून आपुलकीने त्यांची विचारपूस करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याला शाहरुख खानची उपमा दिली आहे. इतकंच नाही तर पृथ्वीकने सुद्धा हा व्हिडीओ शेअर करत शाहरुखच्या 1997 मधल्या येस बॉस या सिनेमातील चाँद तारे...बस इतना सा ख्वाब हैं हे गाणं प्ले केलं आहे.

"वाढदिवसानिमित्त तुम्ही साऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छा घेऊन नव्या वर्षात पदार्पण करतोय. हे प्रेम असाच राहू द्या मायबाप. अखेरच्या श्वासापर्यंत तुमच मनोरंजन करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करत राहीन," असं कॅप्शन पृथ्वीकने या व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, पृथ्वीकचा वाढदिवस ३० नोव्हेंबरला असतो. त्यामुळे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून नावारुपाला आलेल्या पृथ्वीकने नुकतंच त्याच्या हक्काचं घर खरेदी केलं आहे. याची माहितीही त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेताशाहरुख खानसेलिब्रिटी