Join us
Daily Top 2Weekly Top 5

'छावा'मध्ये काम करायला मिळालं असतं तर...'चार दिवस सासूचे' फेम अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा

By ऋचा वझे | Updated: February 25, 2025 13:01 IST

प्रेक्षकांसह अनेक कलाकारही 'छावा' सिनेमाचं भरभरुन कौतुक करत आहेत.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) सिनेमा गेल्या तीन आठवड्यापासून थिएटर्समध्ये हाऊसफुल सुरु आहे. या सिनेमाने प्रेक्षकांवर वेगळीच जादू केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळावर सिनेमा आधारित आहे. त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. विकी कौशलच्या दमदार अभिनयाची खूप स्तुती होत आहे. नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्याने 'छावा' मध्ये काम करता आलं असतं तर मजा आली असती असं वक्तव्य केलं. कोण आहे तो?

'छावा' सारख्या भव्यदिव्य आणि आपल्या महाराजांवर आधारित अशा ऐतिहासिक सिनेमाचा भाग व्हायला कोणाला नाही आवडणार? नुकतंच एका मराठी अभिनेत्यानेही ती इच्छा बोलून दाखवली. 'चार दिवस सासूचे', 'अवघाची संसार', 'पवित्र रिश्ता' यांसारख्या मालिकांमध्ये दिसलेला मराठीतील अतिशय अनुभवी अभिनेता पंकज विष्णू (Pankaj Vishnu). त्याने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. सध्या पंकज विष्णू हिंदी मालिका, वेब सीरिजमध्ये दिसत आहे. 

आणखी कोणत्या प्रोजेक्ट्समध्ये आणि कोणासोबत काम करायची इच्छा आहे असं विचारलं असता तो म्हणाला, "मला चित्रपट, वेबसीरिज करायच्याच आहेत. तसंच आता रिलीज झालेल्या 'छावा' मध्ये काम करायला मिळालं असतं तर खूप मजा आली असती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप आपुलकी आहे. त्यासंबंधी काही काम करावं असं नेहमीच वाटतं. तेच छावा मध्ये करता आलं असतं तर आवडलं असतं पण ठिके हरकत नाही. भविष्यात कधी अशी संधी कदाचित मिळेलही."

तो पुढे म्हणाला, "तसंच वेबसीरिजचे तर वेगळेच स्टार झालेत जयदीप अहलावत असो किंव विजय वर्मा हे ओटीटीवरचे स्टार आहेत. अगदी फिल्म स्टार्स करीना कपूर, आलिया भट वगरे सुद्धा यांच्यासोबत ओटीटीवर काम करतायेत. कारण इथे ओटीटीवर अहलावत, विजय वर्मा अशा अभिनेत्यांचं राज्य आहे. त्यांच्यासोबतही काम करायला नक्की आवडेल."

पंकज विष्णू सध्या 'डोरी' या हिंदी मालिकेत भूमिका साकारत आहे. याशिवाय त्याची हॉटस्टारवर 'पॉवर ऑफ पांच'ही सीरिजही आली आहे जी खूप गाजत आहे.  

टॅग्स :मराठी अभिनेता'छावा' चित्रपटबॉलिवूड