Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग

By कोमल खांबे | Updated: July 22, 2025 11:28 IST

एक अभिनेता असण्याबरोबरच नकुल उत्तम डान्सरही आहे. त्याने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. लहानपणापासूनच नकुलला डान्सची आवड होती. पण, यामुळे त्याला हिणवलं जायचं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल त्याने भाष्य केलं. 

'अजूनही चांद रात आहे', 'गाथा नवनाथांची', 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' अशा मालिकांमध्ये भूमिका साकारून अभिनेता नकुल घाणेकर घराघरात पोहोचला. काही सिनेमांमध्येही तो दिसला. एक अभिनेता असण्याबरोबरच नकुल उत्तम डान्सरही आहे. त्याने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. लहानपणापासूनच नकुलला डान्सची आवड होती. पण, यामुळे त्याला हिणवलं जायचं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल त्याने भाष्य केलं. 

नकुलने रेडिओ सिटीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने लहानपणी डान्स करण्यावरुन आईबाबांनाही बोललं जायचं याबद्दल सांगितलं. पण, तरीही आईवडिलांनी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नेहमी त्याला पाठिंबा दिला. तो म्हणाला, "आईबाबांनाही बोललं गेलं. काय गं विद्या तुझा दुसरी-तिसरीतला मुलासारखा मुलगा तो घुंगरू घालतो? ही २० वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बाबांना पण लोक म्हणायचे. काय अशोक...तुझा मुलगा घुंगरू घालतो...त्याला नाच्या बनवायचंय? छक्का बनवायचंय? हे शब्द मी ऐकले आहेत". 

"पण, मला याबद्दल अजिबातच रिग्रेट नाही. ते असं कसं मला बोलले, असं मला वाटत नाही. कसं मला वाईट वाटलं. हे असं बोलून कधीच कोणाचं भलं झालेलं नाही. त्यांचं ते म्हणणं कुठेतरी माझ्या डोक्यात राहिलं. आणि मग मी असं ठरवलं की मी असा नाचेन की असं बोललं पाहिजे काय पुरुषी नाचतो हा...क्या बात है. महादेव, कृष्ण यानेच केलं पाहिजे, असं बोललं पाहिजे. हे मी चॅलेंज म्हणून घेतलं. त्यांनी मला ट्रोल केलं म्हणून आता मी कथ्थक अशाप्रकारे नाचतो. आणि त्यामुळे माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये कथ्थकबद्दल गैरसमज नाहीत", असंही नकुल म्हणाला.  

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकार