Join us

आता खरी मजा येणार! देवमाणसाचा खेळ खल्लास करायला 'तो' येतोय; मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याच्या एन्ट्रीने प्रेक्षक खुश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:19 IST

देवमाणसाचा खेळ खल्लास करायला 'तो' येतोय; मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री

Devmanus Serial New Entry: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे देवमाणूस. या मालिकेच्या दोन भागांनी रसिकांना खिळवून ठेवले. त्यानंतर आता देवमाणूस मालिकेचा मधला अध्याय प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या तिसऱ्या भागाला देखील मालिका रसिकांची पसंती मिळताना दिसतेय.पैशांच्या लोभापायी अनेकांच्या जीवावर उठलेल्या देवीसिंग उर्फ गोपाळला आता अद्दल घडवायला  नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे.त्यामुळे प्रेक्षक देखील खुश झाले आहेत.

नुकताच सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीकडून देवमाणूस- मधला अध्याय मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे."देवमाणसाचा खेळ खल्लास करायला येतोय इन्स्पेक्टर मार्तंड जामकर!"अशी माहिती या प्रोमोद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान, स्त्रियांना लक्ष्य बनवीत असलेल्या देवीसिंगच्या आयुष्यात आता वादळ येणार आहे. मालिकेतील हुकमी एक्का असलेल्या इन्स्पेक्टर मार्तंड जामकरची एन्ट्री झाली आहे. ही भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे साकारताना दिसणार आहेत. पहिल्याच भागापासून प्रसिद्ध असलेलं हे पात्र आता मधल्या अध्यायातही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.त्यामुळे मालिकेचं कथानक आता कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

मार्तंड जामकर यांच्या एन्ट्रीनं प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. डॉक्टर अजित कुमारला अद्दल घडवणाऱ्या मार्तंड जामकरच्या येण्याने आता देवी सिंगची हवा टाईट झाली आहे.दरम्यान, मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता खरी मजा येईल, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी हा प्रोमो पाहून केल्या आहेत.

टॅग्स :किरण गायकवाडटिव्ही कलाकारसोशल मीडिया