Join us

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने घेतली नवीन गाडी; कुटुंबासह केली पूजा, किंमत ऐकून थक्क व्हाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 12:09 IST

'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी; किंमत किती?

Nikhil Rajeshirke: आपल्या हक्कांच घर आणि फिरण्यासाठी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. शिवाय प्रत्येकजण अगदी जिद्दीने ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत असतो. सध्या मालिकाविश्वात लोकप्रिय असणाऱ्या अशाच एका अभिनेत्याची स्वप्नपूर्ती झाली आहे. हा अभिनेता म्हणजे निखिल राजेशिर्के आहे. नुकतीच निखिलने नवीन गाडी खरेदी केली आहे. 

निखिल राजेशिर्के हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो झी मराठी वाहिनीवर लक्ष्मी निवास मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत तो संतोष नावाची भूमिका साकारत आहे. दरम्यान, अभिनेत्याने स्वत चं स्वप्नपूर्ण करत नवीन गाडी घेतली आहे. निखिल राजेशिर्केने मारुती सुझुकीची नेक्सा ही नवी गाडी खरेदी केली आहे. अभिनेत्याने त्याची पत्नी, आई-वडील तसेच कुटुंबियांच्या साथीने नव्या गाडीची पूजा देखील केली आहे. मीट माय न्यू हमसफर असं कॅप्शन देत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने नव्या गाडीची झलक चाहत्यांना दाखवली आहे. 

दरम्यान, या गाडीची किंमत जवळपास ५.८५ लाख रुपये इतकी आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून तसेच चाहत्यांकडून निखिलवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. 

वर्कफ्रंट

'छोटी मालकीण', 'रंग माझा वेगळा', 'असेही एकदा व्हावे', 'अजूनही बरसात आहे', 'माझी तुझी रेशीमगाठ' यांसारख्या मालिकांमधून अभिनेता निखिल राजेशिर्के घराघरात पोहोचला. याशिवाय'बिग बॉस मराठी'मध्ये सहभाग घेतला होता. निखिलने अनेक सिनेमांतही काम केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया