Kushal Badrike Post : कुशल बद्रिके (Kushal Badrike) हे नाव सर्वांनाच परिचयाचं आहे. चला हवा द्या या कार्यक्रमामुळे तो घराघरात पोहोचला. उत्तम अभिनय आणि त्याला विनोदाची जोड देत त्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. कुशल बद्रिकेसोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचा पाहायला मिळतो. त्याद्वारे आपल्या आयुष्यातील महत्वाच्या अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो. नुकतीच त्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एख मजेशीर पोस्ट लिहून शेअर केली आहे.
कुशल बद्रिकेने त्याच्या लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट चर्चेत आहे. त्यामध्ये कुशलने पत्नीबरोबरचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अभिनेत्याने पत्नीला मजेशीर अंदाजात शुभेच्छा देत लिहिलंय, Happy लग्नाचा वाढदिवस. आधी माझ्याकडे जराही patience नव्हते पण मग माझं लग्न झालं, आता मी भयंकर संयमी आहे .आधी मला कायम माझ्या दिसण्यावर न्यूनगंड होता पण “सुनयना”, तुझ्या सोबत लग्न झालं आणि एका वाक्यात तू माझा गैरसमज दूर केलास ते वाक्य म्हणजे “थोबाड पाहिलंस का आरश्यात”. लग्नापर्यंत मी कधीही उपवास केला नव्हता पण लग्ना नंतर मात्र हे उपवासाचं पुण्य मला नेहमी लाभतं , माझे मित्र jealousy ने त्याला उपासमार म्हणतात ते जाऊद्या. "
यापुढे कुशलने लिहिलंय की, "शाळेत असताना परिसर अभ्यास मध्ये स्वावलंबनाचे धडे वाचले होते ,ते सगळे लग्नानंतर कामाला आले.शाळेत स्काऊट मधे हट्टाने गेलो होतो,तिथे शिकलो की “खडतर परिस्थितीतही न डगमगता आयुष्याशी लढा द्यायला हवा” हल्ली मला ती गोष्ट फार-फाऽऽऽऽर कामी येते. माझ्या आई ने माझ्या लहानपणी मला खूप बदडबदड बदडलय ,खरतर बुकलून काढलंय, पुढेमाझ्या बायकोने माझं बालपण आई सारखच छान जपलं . शेवटी बायकोला अनंत काळाची माता म्हणतात ते काय उगीच !असो ,आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आजच माझी बायको कार्यक्रमाच्या निमित्ताने परदेशात जात आहे. हे म्हणजे बर्थडे दोघांचा पण गिफ्ट मला एकट्यालाच असं झालं आहे ! त्यामुळे माझं आभाळ आज बायको पेक्षाही ठेंगणं झालं आहे !".
दरम्यान, सध्या सोशल मीडियालर कुशल बद्रिकेने पत्नीसाठी लिहिलेली ही पोस्ट चर्चेत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.