Join us

'देवमाणूस'ची जंगल सफर; किरणने शेअर केलेलं नयनरम्य दृश्य पाहून जाल भारावून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 16:02 IST

Kiran gaikwad: किरणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो जंगलातून पायवाट तुटवत एका धबधब्यापर्यंत गेल्याचं पाहायला मिळतं.

'लागिरं झालं जी', 'देवमाणूस' अशा गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड (kiran gaikwad). कलाविश्वात सक्रीय असलेला किरण सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे तो कायम चाहत्यांच्या भेटीसाठी नवनवीन फोटो, व्हिडीओ घेऊन येत असतो. यावेळी त्याने निसर्गाच्या सानिध्यातील एक छानसा व्हिडीओ शेअर केला आहे.

किरण फावल्या वेळात नवनवीन ठिकाणांना भेट देत असतो त्यामुळे बऱ्याचदा तो या ठिकाणचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करतो. यावेळी त्याने पावसाळी ट्रेक केला असून एका नयनरम्य अशा धबधब्याला भेट दिली. येथील व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

किरणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो जंगलातून पायवाट तुटवत एका धबधब्यापर्यंत गेल्याचं पाहायला मिळतं. धबधब्यापर्यंत जाणारा हा रस्ता हिरव्यागार झाडांनी पूर्ण आच्छादलेला दिसून येत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला खो गये हम कहा हे गाणं सुरु असल्याचं ऐकायला मिळतं.  

टॅग्स :किरण गायकवाडसेलिब्रिटीटेलिव्हिजन