Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अभिनेत्याचा डोळा थोडक्यात वाचला; चित्रीकरण अर्धवटच सोडून घेतोय विश्रांती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 14:19 IST

आता काही दिवस विश्रांती, जीव माझा गुंतला च्या शूटदरम्यान दुखापत झाली. बरं झालं देवा थोडक्यात डोळा वाचला अभिनेत्याची पोस्ट

फिट अॅंड फाईन मराठी अभिनेतादेवदत्त नागे कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ मालिकेमध्ये काम करताना दिसत आहे. मात्र आता त्याला काही काळ कामातून ब्रेक घ्यावा लागणार असे दिसते.त्याच्या डोळ्याखाली दुखापत झाल्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

थोडक्यात डोळा वाचला 

देवदत्त कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’  मालिकेच्या चित्रीकरणामध्ये  सध्या व्यग्र आहे. मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान देवदत्तच्या डोळ्याखाली मार लागला. 'आता काही दिवस विश्रांती, जीव माझा गुंतला च्या शूटदरम्यान दुखापत झाली. बरं झालं देवा थोडक्यात डोळा वाचला.' असे कॅप्शन त्याने लिहिले आहे. 

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' सिनेमात देवदत्त नागेची भुमिका आहे. त्याने यामध्ये हनुमानाची भूमिका साकारली आहे. ओम राऊत यांच्या 'तानाजी' सिनेमातही देवदत्तने काम केले आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतादेवदत्त नागेअपघात