Join us

"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."

By कोमल खांबे | Updated: November 1, 2025 11:12 IST

रोहित आर्याने काही मराठी सेलिब्रिटींनाही संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. काही सेलिब्रिटींनी त्याच्या स्टुडिओला भेटही दिली होती. या घटनेच्या दोनच दिवस आधीच मराठी अभिनेता आयुष संजीव आरए स्टुडिओमध्ये गेला होता. तो रोहित आर्यालाही भेटला होता.

रोहित आर्या प्रकरणाने मुंबई हादरून गेली आहे. पवईमधील आरए स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी बोलवलेल्या मुलांना रोहित आर्याने ओलीस ठेवले होते. गुरुवारी(३० ऑक्टोबर) ही धक्कादायक घटना घडली. रोहित आर्याने काही मराठी सेलिब्रिटींनाही संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. काही सेलिब्रिटींनी त्याच्या स्टुडिओला भेटही दिली होती. या घटनेच्या दोनच दिवस आधीच मराठी अभिनेता आयुष संजीव आरए स्टुडिओमध्ये गेला होता. तो रोहित आर्यालाही भेटला होता. इन्स्टाग्राम स्टोरीमधून त्याने याबद्दल सांगितलं आहे. 

आयुषने लिहिलंय की "मी रोहित आर्याला दोन दिवसांपूर्वीच भेटलो होतो. त्याने मला त्याचा आगामी 'लेट्स चेंज ४' या सिनेमात भूमिकेसाठी ऑफर दिली होती. त्याने तेव्हा सिनेमाची जी कथा सांगितली होती आणि नंतर जी घटना घडली त्यामध्ये बरंच साम्य होतं. त्यामुळेच ही संपूर्ण घटना माझ्यासाठी एक मोठा धक्का होता. मी त्याला आधीपासून ओळखत होतो. ८-९ वर्षांपूर्वी मी त्याच्या सिनेमात काम केलं होतं. त्यामुळे मला त्याच्यावर शंका येण्याचं काहीच कारण नव्हतं. जे काही घडलं ते खरंच खूप धक्कादायक आणि गोंधळात टाकणारं आहे". 

"मी त्या वर्कशॉपमधल्या लहान मुलांनाही भेटलो होतो. त्यांच्यासोबत फोटोही क्लिक केले होते. सगळं काही एकदम नॉर्मल दिसत होतं. सुदैवाने सगळी लहान मुलं सुखरुप आहेत", असं म्हणत आयुषने लहान मुलांसोबत काढलेला फोटो शेअर केला आहे. आयुषबरोबरच गिरीश ओक, उर्मिला कोठारे आणि अन्य काही कलाकारांनीही रोहित आर्याच्या स्टुडिओला भेट दिली होती. तर रुचिता जाधव हिलादेखील रोहित आर्याने संपर्क करत स्टुडिओमध्ये बोलवलं होतं. मात्र, काही कारणांमुळे तिला जाता आलं नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi actor reveals meeting Rohit Arya before hostage incident.

Web Summary : Actor Ayush Sanjeev met Rohit Arya days before the hostage situation. Arya offered him a role. Sanjeev knew Arya, so he had no suspicion. Other celebrities also visited Arya's studio.
टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता