Join us

'जवान'मधील गाण्यावर अविनाश नारकरांनी केला जबरदस्त डान्स; व्हिडीओ पाहून चाहते झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 14:44 IST

Avinash narkar: अविनाश नारकर यांनी फॉलो केला नवा ट्रेंड

मराठी कलाविश्वातील बिनधास्त, मनमौजी आणि तितकाच उत्कृष्ट अभिनेता म्हणजे अविनाश नारकर (avinash narkar). अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अविनाश नारकर त्यांच्या स्वच्छंदी स्वभावामुळेही तितकेच चर्चेत येत असतात. सोशल मीडियावर कोणताही नवा ट्रेंड आला की ते लगेच तो फॉलो करतात. त्यामुळे त्यांच्या भन्नाट रिल्स, व्हिडीओची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते. नुकताच त्यांनी एका नवा ट्रेंड फॉलो केला असून त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

अविनाश नारकर सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे ते कायम नवनवीन व्हिडीओ, फोटो शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. यात बऱ्याचदा ते ट्रेंडींग गाण्यावर रिल्सदेखील करतात. असाच एक भन्नाट व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

अविनाश नारकर यांन शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमातील 'चलेआ' या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या दोन सहकाऱ्यांनीही त्यांना साथ दिली आहे. सध्या अविनाश यांच्या या व्हिडीओवर नेटकरी कमालीच्या कमेंट करत आहेत. इतकंच नाही तर अभिनेत्री आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या नारकर यांनीही कमेंट केली आहे. 

टॅग्स :अविनाश नारकरजवान चित्रपटशाहरुख खानऐश्वर्या नारकर