Halad Rusli Kunku Hasla : सध्या मराठी मालिकाविश्वात नवनवीन विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात आता मराठी कलाविश्वात हळद रुसली कुंकू हसलं मालिकेची जोरदार चर्चा सुरु आहे. या मालिकेत समृद्धी केळकरसह अभिषेक रहाळकर प्रमुख भूमिका साकारणार आहे.त्याचबरोबर मालिकेत अभिनेत्री पूजा पवार, अमित परब असे कलाकार देखील पाहायला मिळणार आहे. येत्या ७ जुलैपासून ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. त्यात आता आणखी एक लोकप्रिय अभिनेता या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अलिकडच्या काळात अनेक सेलिब्रिटी मंडळी छोट्या पडद्यावर एन्ट्री घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच स्टार प्रवाह वाहिनीवर मालिकाविश्वात लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळे देखील पाहायला मिळणार आहे. आस्ताद हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत तो आढळराव सरपंचच्या भूमिकेत दिसणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नव्या पोस्टरची झलक दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये आस्ताद काळे पाहायला मिळतो आहे.
अभिनेता आस्ताद काळे नाटक, मालिका, सिनेमांमधून नावारुपाला आला आहे. 'असंभव', 'वादळवाट', अग्निहोत्र, या गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. त्याचबरोबर पुढचं पाऊल मालिकेतही त्याने साकारलेली भूमिका विशेष गाजली. अलिकडेच तो सोनी मराठी वाहिनीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या हॉरर मालिकेत दिसला होता.